Home | Business | Industries | invest 2 lacks in this business, earn 4 lacks every year

2 लाखांत सुरु करा हा बिझनेस, 4 लाख राहिल वार्षिक इन्कम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 08, 2018, 03:52 PM IST

मुंबई- प्रत्येकाला वाटते आपला स्वतंत्र बिझनेस असावा. नोकरी करणारेही बिझनेस सुरु करण्याच्या मानसिकतेत असतात.

 • invest 2 lacks in this business, earn 4 lacks every year

  मुंबई- प्रत्येकाला वाटते आपला स्वतंत्र बिझनेस असावा. नोकरी करणारेही बिझनेस सुरु करण्याच्या मानसिकतेत असतात. पण भांडवल आणि टेक्निकल नॉलेज नसल्याने निर्णय घेताना मागे पुढे बघतात. आज आम्ही तुम्हाला अशा बिझनेसची माहिती देणार आहोत जो सुरु करण्यासाठी जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही. विशेष म्हणजे याची मार्केटमध्ये जास्त मागणी असल्याने बिझनेस चांगला चालण्याची मोठी शक्यता आहे. एवढेच नव्हे तर बिझनेस सुरु करण्याला सरकार पूर्ण सपोर्ट करते. लोनही देण्यासाठी मदत करते.

  सुरु करा टोमॅटो सॉस मॅन्युफॅक्चरिंग युनिट
  तुम्ही जेव्हा पिझा, बर्गर, सामोसे खाता तेव्हा टोमॅटो सॉस शिवाय त्याची चव येत नाही. विचार करा, तुम्ही टोमॅटो सॉस मॅन्युफॅक्चरिंग युनिट लावले तर तुमचा निश्चितच चांगला बिझनेस होईल. डिमांड बघितली तर हा बिझनेस चालण्याची पूर्ण शक्यता आहे.

  पुढील स्लाईडवर वाचा, काय असेल प्रोजेक्ट कॉस्ट... असे उभारता येईल प्लॅंट....

 • invest 2 lacks in this business, earn 4 lacks every year

  काय असेल प्रोजेक्ट कॉस्ट

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी पंतप्रधान मुद्रा स्कीम लॉंच केली आहे. या स्कीम अंतर्गत बेरोजगारांना बिझनेस सुरु करण्यासाठी लोन दिले जाते. कोणत्याही प्रोजेक्टला हे लोन दिले जाते. याच्याशी संबंधित काही प्रोजेक्ट प्रोफाईल वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तुम्ही टोमॅटो सॉस मॅन्युफॅक्चरींग युनिट लावत आहात तर तुमच्याजवळ १ लाख ९५ हजार रुपये असणे आवश्यक आहे. त्यावर तुम्हाला १.५० लाख टर्म लोन आणि ४.३६ लाख वर्किंग कॅपिटल लोन मिळेल. या संपूर्ण प्रोजेक्टची कॉस्ट सुमारे ७.८२ लाख राहिल.

 • invest 2 lacks in this business, earn 4 lacks every year

  किती असेल इन्कम

  या प्रोजेक्टमध्ये तुम्ही वार्षीक ३० हजार किलोग्रॅम टोमॅटो सॉस तयार करु शकता. याचे वार्षीक प्रोडक्शन कॉस्टसुमारे २४ लाख ३७ हजार असेल. हा सॉस तुम्ही ९५ रुपये प्रति किलोग्रॅम रेटने विकला तर वार्षीक टर्नओव्हर २८ लाख ५० हजार राहिल. म्हणजेच तुम्हाला सुमारे ४ लाख १२ हजार इन्कम होईल. प्रत्येक वर्षी त्यात वाढ होत जाईल.

Trending