Home | Business | Industries | know about Indian ecommerce giant flipkart

फ्लिपकार्टचा पहिला कर्मचारी, विकलेले पहिले पुस्तक; 10 इंटरेस्टिंग फॅक्टस

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 10, 2018, 12:11 PM IST

अमेरिकन कंपनी वॉलमार्टने भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केली आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या अहवा

 • know about Indian ecommerce giant flipkart

  नवी दिल्ली- अमेरिकन कंपनी वॉलमार्टने भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट खरेदी केली आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचच्या अहवालात म्हटले आहे की, 43 टक्के हिस्स्यासह फ्लिपकार्ट मार्केट लीडर आहे. त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, 2019 मध्ये फ्लि‍पकार्ट 44 टक्के शेअर कायम राखण्यात यशस्वी होईल. अमेझॉनचा मार्केट शेअर 37 टक्के तर स्नॅपडीलचा मार्केट शेअर केवळ 9 टक्के आहे.

  चला जाणून घेऊ यात फ्लिपकार्टशी निगडित 10 इंटरेस्टिंग फॅक्टस
  1. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी 2007 मध्ये बंगळुरु येथे फ्लिपकार्टची स्थापना केली. या दोघांची भेट आयआयटी-दिल्लीत 2005 मध्ये झाली होती. त्यांनी अमेझॉनमध्ये काम केले. फ्लिपकार्टची सुरुवात ऑनलाईन पुस्तके विकणारी कंपनी म्हणून झाली होती.
  2. फ्लिपकार्टच्या प्‍लेटफॉर्मवरुन विकले गेलेले पहिले मराठी पुस्तक जॉन वुड्स यांचे 'लिविंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्‍ड' हे होते. आपल्या पहिल्या वर्षात फ्लिपकार्टने केवळ 20 पुस्तके विकली होती.
  3. फ्लिपकार्टचे अंबर अयप्‍पा हे पहिले पुर्णवेळ कर्मचारी होते.
  4. ऑक्‍टोबर 2009 मध्ये पार्टनर आणि गुंतवणूकदार म्हणून एसेल कंपनीच्या संचालक मंडळावर आले. त्यांनी 10 लाख डॉलरची गुंतवणूक केली. काही महिन्यानंतर अमेरिकेच्या हेज फंड टायगर ग्‍लोबलने एसेल सोबत 1 कोटी डॉलरची गुंतवणूक केली. फ्लिपकार्टला 1.4 अब्ज डॉलर टेंसेंट, ईबे आणि मायक्रोसॉफ्टकडून मिळाले. तर सॉफ्टबॅंक व्हिजन फंडाने गतवर्षी 2.5 अब्ज डॉलर टाकले.
  5. फ्लिपकार्ट 2011 मध्ये सिंगापूरमध्ये रजिस्‍टर झाली.

  पुढे वाचा...

 • know about Indian ecommerce giant flipkart

  भारतात 'कॅश ऑन डिलिव्हरी' मॉडल घेऊन आली आहे फ्लिपकार्ट
  6.  2010 मध्ये फ्लिपकार्टने भारतात 'कॅश ऑन डिलिव्हरी' मॉडल आणले. त्यामुळे भारतातील ऑनलाइन शॉपिंग बाजारात मोठा बदल झाला.
  7. फ्लिपकार्टने वीरीड, लेट्सबाय, एफएक्‍स मार्ट, मिंत्रा आणि यूपीआई पेमेंट स्‍टार्टअप फोन पे कंपन्या त्यांनी खरेदी केल्या. 
  8. 2017 हे वर्ष फ्लिपकार्टसाठी खूपच महत्वपुर्ण ठरले. कारण याच वर्षी कंपनीने 10 कोटी रजिस्‍टर्ड यूजर्सचा आकडा पार केला. आता फ्लिपकार्टचे एक लाखाहून  अधिक रजिस्‍टर्ड सेलर्स आणि 21 वेअरहाउस आहेत.
  9. फ्लिपकार्टच्या मॅनेजमेंटमध्येही फेरबदल झाले. टाइगर ग्‍लोबलचे एक्झिक्‍यूटिव्ह कल्‍याण कृष्‍णमूर्ती हे फ्लिपकार्टचे सीईओ झाले. सहसंस्थापकबिन्‍नी बन्सल ग्रुप सीईओ आहेत. तर सचिन बन्सल हे अध्यक्ष 
  आहेत.
  10. फ्लिपकार्टने स्‍नॅपडीलला खरेदी करण्याचा प्रयत्न केला पण ही डील होऊ शकली नाही. त्यानंतर वॉलमार्टसोबत मेगा डील करण्यासाठी फ्लिपकार्टने गुंतवणूकदारांकडून 35 कोटी डॉलर मूल्‍याचे शेअर बायबॅक केले.  

Trending