Home | Business | Industries | know about most eligible bachelor billionaire girls

या अब्जाधीशांच्या मुली आहेत बॅचलर, ईशा अंबानींच्या लग्नामुळे आल्या चर्चेत

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 09, 2018, 12:06 AM IST

देशातील सगळ्यात श्रीमंत बिझनेसमॅन मुकेश अंबामी यांच्या एकुलत्या एक मुलीचे ईशाचे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. मुकेश

 • know about most eligible bachelor billionaire girls

  नवी दिल्ली- देशातील सगळ्यात श्रीमंत बिझनेसमॅन मुकेश अंबामी यांच्या एकुलत्या एक मुलीचे ईशाचे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. मुकेश अंबानी यांनी पिरामल समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांना आपले जावई म्हणून निवडले आहे. पण अशा अनेक अब्जाधीशांच्या मुली आहेत ज्या अजुनही बॅचलर आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही अब्जाधीशांच्या मुलींबद्दल सांगत आहोत.

  जयंती चौहान
  - बिसलेरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर आणि रमेश चौहान यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान आपला कौटूंबिक व्यवसाय सांभाळत आहेत. सॉफ्ट ड्रिंक किंग रमेश चौहान यांनी थम्स अप, लिम्का सारख्या प्रॉडक्टसद्वारे बिसलेरी इंटरनॅशनलला एका नव्या शिखरावर पोहचवले. रमेश चौहान यांनी आपली जबाबदारी जयंती यांच्यावर सोपविण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण हे त्यांचे वय होते. जयंती यांनी आपल्या वडिलांच्या अपेक्षांची पुर्तता करत बिसलरी ब्रॅण्डला पुढे नेले. कंपनीच्या डायरेक्टर म्हणून जयंती मार्केटिंग आणि ब्रॅन्डिंगवर खास लक्ष देतात. जयंती यांना फोटोग्राफीची आवड आहे.

  पुढे वाचा: आणखी एका अब्जाधीश उद्योगपतीच्या बॅचलर मुलीबाबत...

 • know about most eligible bachelor billionaire girls

  अनन्या बिर्ला

   

  कुमार मंगलम आणि निरजा बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला या नुकत्याच व्यावसायिक जगताशी निगडित झाल्या आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड येथून शिक्षण घेतले आहे. त्यांनी मायक्रोफायनान्स फर्म स्वतंत्र प्रायव्हेट लिमिटेड स्थापन केली. त्याचा कारभार देशातील दोन राज्यात आहे. त्यांच्या 18 ब्रॅन्चमध्ये 100 हून अधिक कर्मचारी काम करतात. त्याच्या या व्यवसायास त्यांच्या कुटूंबानेच निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यांनी आपले दोन म्युझिक अल्बमही लॉन्च केले आहेत. त्यांना संगीताची आवड आहे. 

   

   

  पुढे वाचा: एका आणखी एका अब्जाधीश उद्योगपतीच्या बॅचलर मुलीबाबत...

 • know about most eligible bachelor billionaire girls

  रोशनी कपूर


  येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ राणा कपूर यांची लहान मुलगी रोशनी कपूर शिक्षणाबरोबरच वडिलांच्या व्यवसायातही साथ देत आहे. त्यांची मोठी बहीण राधा कपूर याही व्यवसाय करत आहेत. त्यांची दुसरी मोठी बहीण राखी कपूर वडिलांसोबत काम करत आहे.

   

   

  पुढे वाचा: एका आणखी एका अब्जाधीश उद्योगपतीच्या बॅचलर मुलीबाबत...

 • know about most eligible bachelor billionaire girls

  मानसी किर्लोस्कर


  देशातील एक मोठी कंपनी टोयोटा किर्लोस्कर अम्पायरची मालकीण मानसी किलोस्कर. विक्रम किर्लोस्कर यांची मुलगी. मानसी आता किर्लोस्कर सिस्टिम लिमिटेडची डायरेक्टर आहे. तिला पर्यटनाची आवड आहे.

   

   

  पुढे वाचा: एका आणखी एका अब्जाधीश उद्योगपतीच्या बॅचलर मुलीबाबत...

 • know about most eligible bachelor billionaire girls

  नव्या नवेली नंदा

   

  एस्कॉर्ट्स ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर निखिल नंदा आणि श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या नवेली नंदा आपल्या ग्लॅमरस लाइफ आणि स्टाइलमुळे सोशल वेबसाइट्सवर फेमस आहेत. वर्ष 2017 मध्ये नव्या नंदा पहिल्यांदा वोग ब्यूटी अवार्डमध्ये तिचे आजोबा-आजी म्हणजेच  अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत दिसली. ती तिच्या वडिलांच्या कामकाजात त्यांना मदत करत आहे.

Trending