Home | Business | Industries | know success story of e commerce company flipkart

दोन मित्रांनी 2 खोल्यांमध्ये सुरू केली कंपनी, आज विकली एक लाख कोटीला

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 09, 2018, 08:27 PM IST

भारतातील सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला वॉलमार्टने खरेदी केले आहे. वॉलमार्टने फ्लिककार्टमधील 70 टक

 • know success story of e commerce company flipkart

  नवी दिल्ली- भारतातील सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला वॉलमार्टने खरेदी केले आहे. वॉलमार्टने फ्लिककार्टमधील 70 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. ऑक्टोबर 2007 मध्ये सुरु झालेल्या फ्लिपकार्टने 10 वर्षापुर्वी आपल्या प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी ऑनलाईन मार्केटिंगमध्ये अनेक बदल केले. दोन मित्रांनी दोन खोल्यांमधुन ही कंपनी सुरु केली. आम्ही तुम्हाला या कंपनीची आणि तिच्या यशाची गोष्ट सांगत आहोत.

  अशी बनली फ्लिपकार्ट
  फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल, बिन्नी बन्सल यांची भेट आयआयटी दिल्लीत झाली. आयआयटी पदवीधर असलेल्या या मित्रांनी एक वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले. ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या क्रेझमुळे त्यांनी अमेरिकेची ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन जॉईन केली. येथे काम करतानाच त्यांनी स्वत:ची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ऑक्टोबर 2007 मध्ये त्यांनी दोन-दोन लाख रुपये जमा केले. अमेझॉन सोडल्यानंतर त्यांनी ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट सुरु केली.

  पुढे वाचा: कसा सुरु केला दोन खोल्यांमध्ये व्यवसाय..

 • know success story of e commerce company flipkart

  पहिल्या दहा दिवसात एकही ऑर्डर नाही


  - सचिन आणि बिन्नी यांनी बंगळुरू येथे 2 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये दोन संगणक घेऊन आपला व्यवसाय सुरु केला. ते सुरुवातीला पुस्तकांची ऑनलाईन विक्री करत होते. पहिल्या दहा दिवसात त्यांना एकही ऑर्डर मिळाली नव्हती. याच काळात त्यांना आंध्र प्रदेशातील एका ग्राहकाने ‘लिव्हिंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्‍ड’ या पुस्तकाची ऑर्डर दिली. ही त्यांना मिळालेली पहिला ऑर्डर होती. 

   

   

  18 महिन्यानंतर मिळाला इन्वेस्टर
  कंपनी सुरु केल्यानंतर 18 महिन्यानंतरही सचिन आणि बिन्नी बन्सल यांना दरमहा खर्चासाठी घरच्यांकडून दहा हजार रुपये घ्यावे लागत होते. बिझनेस चालत नसल्याने ते निराश मात्र झाले नव्हते. अखेर नशिबाने त्यांना साथ दिली आणि 2009 मध्ये एसेल पार्टनर (इंडिया) ची साथ मिळाली. त्यानंतर व्यवसाय वाढत गेला आणि फ्लिपकार्टला गुंतवणूकदार मिळत गेले. 2010 मध्ये टायगर ग्लोबलनेही फ्लिपकार्टवर भरवसा दाखवला आणि 2 कोटी डॉलरची गुंतवणूक केली.

   

   

  ऑनलाइन मनी स्‍टोअर प्रीपेड वॉलेट लॉन्च
  गुंतवणूकदार मिळाल्याने कंपनीचा कारभार वाढत गेला. फ्लिपकार्टने 2011 मध्ये ऑनलाइन मनी स्‍टोअर प्रीपेड वॉलेट लॉन्च केले. याला मार्केटमध्ये चांगली पसंती मिळाली. कंपनीने 2012 मध्ये इन्वेस्‍टर्समार्फत 15 कोटी रुपये जमा केले. डिजिटल म्यूझिक स्टोअर फ्लाईट लॉन्च केली.  

  सेलर्ससाठी चांगले मार्केटप्लेस
  दोन स्टोअर लॉन्च केल्यानंतर फ्लिपकार्टने सेलर्सला आपल्या सोबत जोडण्याचा प्लॅन बनवला. वर्ष 2013 मध्ये कंपनीने याचे लॉन्चिंग केले. सेलर्सला फ्लॅटफॉर्म मिळाल्याने काही कंपन्यांनी आपले प्रोडक्ट ऑनलाईन विकण्यात रुची दाखवली. आपले प्रोडक्ट ऑनलाईन विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर फ्लिपकार्टला ऑनलाइन ऑर्डर मिळण्यास सुरुवात झाली. दरम्यान याच काळात कंपनीला आपले डिजिटल म्युझिक स्टोअर बंद करावे लागले. 

   

   

  कंपनीने केला हा प्रयोग
  कंपनी केवळ एवढ्यावरच थांबली नाही तर तिने नवी पेमेंट गेटवे पे-जिप्पी लॉन्च केला. पुढील काही दिवसातच गुंतवणूकदारांकडून 36 कोटी डॉलर जमा केले.

   

   

  पुढे वाचा: प्रयोगही केले आणि विवादांमध्ये सापडले
   

 • know success story of e commerce company flipkart

  बिग बिलियन डे सेल लावला


  2014 मध्ये कंपनीजवळ ग्रॉस मर्चेंडाइज वॉल्‍युम एक अब्ज डॉलर झाला. त्यानंतर कंपनीने 30 कोटी डॉलरमध्ये ऑनलाइन शॉपिंग प्‍लॅटफॉर्म www.myntra.com खरेदी केला. कंपनीने याच वर्षी चीनची ई-कॉमर्स कंपनी अलीबाबा सारखा भारतात बिग बिलियन डे सेल लावला. तेथून कंपनीच्या व्हॅल्यूएशनमध्ये मोठे अंतर आले. आज फ्लिपकार्ट 1.91 अब्ज डॉलरची (जवळपास 12033 कोटी रुपये)  कंपनी झाली आहे. कंपनीला अन्य कंपन्यांकडूनही तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. आज फ्लिपकार्ट ही भारतातील सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी झाली आहे. कंपनीने आपली वेबसाईट बंद करुन मोबाईल अॅप लॉन्च केले आहे.

   

   

  विवादांमध्ये सापडली होती फ्लिपकार्ट
  फ्लिपकार्ट जितक्याने वेगाने पुढे गेली तितकेच विवाद फ्लिपकार्टसोबत जोडले गेले. नुकतीच कंपनी भारती एअरटेलसोबत केलेल्या एका करारामुळे वादात सापडली होती. या अंतर्गत फ्लिपकार्टला एअरटेलच्या प्लॅटफॉर्मवर विशेष स्थान मिळणार होते. याला नेट न्यूट्रॅलिटीचे उल्लंघन मानण्यात आले. त्यामुळे कंपनीला हा करार रद्द करावा लागला.

   

   

  ट्विटरवरही रंगले होते युध्द
  फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि सीईओ सचिन बन्सल यांनी ट्विटरद्वारे आपल्या प्रतिद्वंदी कंपनी स्नॅपडिलवर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटले होते की तुम्ही चांगल्या इंजिनिअरांना नोकरी देऊ शकत नसाल तर याचा दोष भारतास देऊ नका. ते चांगले वर्क कल्चर आणि आव्हाने पाहूनच कंपनी निवडतात. बन्सल यांचे हे ट्विट 'द वॉल स्ट्रीट जर्नल' मध्ये स्नॅपडीलचे सीओओ रोहित बन्सल यांच्या लेखाला दिलेले उत्तर असल्याचे सांगण्यात येत होते. रोहित बन्सल म्हणाले होते की, भारतात असे प्रोग्रामर नाहीत ज्यांची कंपनीला गरज आहे.

Trending