Home | Business | Industries | madhya pradesh offbeat destination

उन्हाळ्यात फिरण्यासाठी हे आहेत 4 बेस्ट ऑफबीट डेस्टिनेशन, खर्चही कमीच

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 23, 2018, 10:00 AM IST

तुम्हाला उन्हाळी सु्ट्ट्यांमध्ये कुठे तरी फिरायला जायचे आहे पण अजुनही कुठे जायचे हे फायनल झाले नसेल तर आम्ही तुम्हाला 4

 • madhya pradesh offbeat destination
  मध्यप्रदेश फिरण्यासाठी अनेक बेस्ट ऑफबीट डेस्टिनेशन उपलब्ध आहेत.

  नवी दिल्ली- तुम्हाला उन्हाळी सु्ट्ट्यांमध्ये कुठे तरी फिरायला जायचे आहे पण अजुनही कुठे जायचे हे फायनल झाले नसेल तर आम्ही तुम्हाला 4 बेस्ट ऑफबीट डेस्टिनेशन सांगत आहोत जेथे तुम्ही कमी खर्चात फिरायला जाऊ शकता. 5,000 रुपयांपेक्षा कमी खर्चात तुम्ही येथे जाऊ शकता.


  जबलपूर- भेड़ाघाट

  मध्यप्रदेशात मध्य जबलपुर येथे तुम्ही मदन महल, बेड़ाघाट, बार्गी डॅम और जैन टेंपल ही ठिकाणी तुम्ही पाहू शकता. येथे राणी दुर्गावतीचे म्युझियम आणि दुमना नेचर पार्क आहे. जबलपूर येथे अनेक ठिकाणी तुम्ही बोटिंगही करु शकता. दिल्लीहून जबलपूरला तुम्ही ट्रेन, फ्लाईट अशा दोन्ही माध्यमातून पोहचू शकता. आजच बुकिंग केल्यास दिल्लीहून जबलपूर फ्लाईटचे तिकीट तुम्हाला 4,299 ते 5,500 रुपयांमध्ये मिळू शकते. तुम्ही रेल्वेचा पर्यायही स्वीकारु शकता.

  पॅकेज- 2 रात्री 3 दिवस


  किंमत- 6,500 रुपये प्रती व्यक्ती


  कशाचा समावेश- हॉटेलमधील मुक्काम, ब्रेकफास्ट, रेल्वे तिकीट

  पुढे वाचा: काय आहेत ऑप्शन

 • madhya pradesh offbeat destination
  मध्य प्रदेश - पंचमढ़ी

  पंचमढी

   


  पंचमढी सतपुराची राणीसुध्दा म्हटले जाते. पंचमढी मध्य प्रदेशचे थंड हवेचे ठिकाण आहे. ते झऱ्यांसाठी प्रसिध्द आहे. उन्हाळ्यातही येथील वातावरण थंड असते. रेल्वेने येथे सहज पोहचता येते. त्यासाठी पिपरिया रेल्वे स्थानकावर उतरावे लागते. येथून पंचमढी 54 किलोमीटर अंतरावर आहे. येथे 2,500 ते 3,500 रुपयांमध्ये हॉटेल भेटते. 

   

  पॅकेज - 2 रात्री, 3 दिन

   

  किंमत – 9,000 रुपये (प्रति व्यक्ती)

   

  कशाचा समावेश - हॉटलमधील मुक्काम, ब्रेकफास्ट, रेल्वेचे तिकीट

   

   

  ओर्छा

   

  पॅलेस आणि मंदिरांचे शहर असलेले ओर्चा जंगलांनी घेरलेले आहे. मध्यप्रदेश पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात फिरण्यासाठीही एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे रेल्वेने जाऊ शकता. दिल्ली-एनसीआर येथून या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचे थर्ड एसीचे तिकीट 1,600 रुपये आहे

  .

  पॅकेज- 2 रात्री, 3 दिवस


  किंमत- 6,500 रुपये (प्रति व्यक्ती)


  कशाचा समावेश- हॉटेलमधील मुक्काम, ब्रेकफास्ट

   

   

  पुढे वाचा: आणखी काय ऑप्शन 

 • madhya pradesh offbeat destination
  बांधवगढ राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिध्द आहे.

  बांधवगढ राष्ट्रीय उद्यान

  बांधवगढ राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिध्द आहे. याशिवाय येथे ज्वालामुखी टेम्पल, बांधवगढ किल्ला, शेश शइया, बडी गुफा ही ठिकाणे बघण्यासारखी आहेत. येथे रेल्वेने जाणेच उत्तम ठरते.  
   
  पॅकेज - 2 रात्री, 3 दिन

  किंमत – 6,500 रुपये (प्रति व्यक्ती)

  कशाचा समावेश - हॉटलमधील मुक्काम, न्याहारी (ब्रेकफास्ट), रेल्वे तिकीट


   

  मध्य प्रदेशात कसे फिराल
   
  मध्य प्रदेश फिरण्यासाठी आणि ट्रॅव्हल पॅकेज बुक करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारचे संकेतस्थळ आहे. यावरून तुम्ही बजेट हॉटल आणि सरकारी गेस्ट हाउसची माहिती घेऊ शकता. मध्यप्रदेशात कुठे फिरु शकता यांची संपुर्ण माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. याठिकाणी वॉटर स्पोर्ट्स, क्रूझ, बोटिंग सारख्या सुविधा आहेत का याचीही माहिती तुम्ही येथून घेऊ शकता. मध्य प्रदेशात फिरण्यासाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

   

   

  पॅकेज - 2 रात्री, 3 दिन

   

  किंमत – 6,500 रुपये (प्रति व्यक्ती)

   

  कशाचा समावेश - हॉटेलमध्ये मुक्काम, ब्रेकफास्ट

   

Trending