आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 रुपयात मथुरा-वृंदावनमध्ये बुक करा खोली, 10 दिवसांपूर्वी बनवा प्लॅन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही जर उन्हाळ्यात कुटूंबासमवेत मथुरा-वृंदावन फिरण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला कमी किंमतीत राहण्याचे काही ऑप्शन्स उपलब्ध आहेत. असे अनेक आश्रम आहेत जिथे तुम्ही केवळ 300 रुपयात राहू शकता. 

 

 

कसे जाल मथूरा-वृंदावनला
जर तुमच्याकडे स्वत:ची कार असेल तर त्या कारने तुम्ही मथुरा-वृंदावनला जाऊ शकता. दिल्लीहून मथुरा-वृंदावनचे अंतर हे 182 किलोमीटर आहे. दिल्लीहून तुम्ही तिथे 3 तासात पोहचू शकता. तुम्ही एका दिवसात तिथे फिरुन परतही येऊ शकता किंवा तुमची ईच्छा असल्यास राहु शकता.

 

 

व्हॉल्वो बस किंवा टॅक्सी
तुम्ही दिल्लीहून व्हॉल्वो बसने या ठिकाणी जाऊ शकता. या ठिकाणी जाण्यासाठी व्हॉल्वो बस 250 रुपये आकारतात. म्हणजेच 500 रुपयात दिल्लीहून मथुरा-वृंदावनला तुम्ही जाऊ-येऊ शकता. तुम्ही प्रायव्हेट कॅब घेऊन गेला तर 5,500 रुपये लागतील तर इनोव्हाने 8,500 रुपये लागतील. 

 

 

रेल्वे आहे उत्तम ऑप्शन 
दिल्लीत न राहणाऱ्या व्यक्तींसाठी रेल्वे हा सर्वोत्तम ऑप्शन आहे. देशातून जवळपास सर्व मुख्य शहरातून येथे जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. विमानाने जाणार असाल तर तुम्हाला दिल्लीला जावे लागेल तेथून तुम्हाला रेल्वे, टॅक्सी, बस हे ऑप्शन आहेत.

 

 

पुढे वाचा: मथुरा-वृंदावनमध्ये कुठे राहाल...

 

बातम्या आणखी आहेत...