आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3S फॉर्मूला वापरून TCS ला बनवले नंबर-1, चंद्रशेखरन यांनी सांगितला यशाचा मंत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी टीसीएसने पुन्हा भारतीयांना अभिमान वाटावा अशी संधी दिली आहे. कंपनी 100 अब्ज डॉलरची मार्केट व्हॅल्यू प्राप्त करणारी देशाची पहिली कंपनी बनली आहे. टीसीएसला या ठिकाणी पोहचवण्यात एन.  चंद्रशेखरन यांचा सिंहाचा वाटा असणार आहे. चंद्रशेखरन हे दीर्घकाळापासून टीसीएसचे चेअरमन होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टीसीएस टाटा समुहाची नंबर एक कंपनी बनली. चंद्रशेखरन यांच्या उत्कृष्ट कामगिरीची परिणाम होता की सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर त्यांच्याकडे संपूर्ण समुहाची जवाबदारी सोपविण्यात आली.

 


3S फॉर्मूल्यावर भरोसा 
चंद्रशेखर यांच्यासाठी यशाची व्याख्या थोडी वेगळी आहे. ते खास पध्दतीच्या सक्सेस मंत्रावर काम करतात. ते अनेकदा आपला सक्सेस मंत्र इतरांसमोरही सांगतात. या शॉर्ट फॉर्मला 3S फॉर्मूला असेही म्हटले जाते. यात प्रत्येक एसचा अर्थ वेगवेगळा आहे. याची चर्चा त्यांनी टाटा सन्सचे चेअरमन होताना केली होती. तसेच नव्या वर्षावर टाटाच्या 7 लाख कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात त्यांनी याचा उल्लेख केला होता.

 

 

पुढे वाचा: 3S फॉर्मूला

बातम्या आणखी आहेत...