आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्रा योजनेमुळे 25% वाढले लहान व्यावसायिक, यूपी-बिहारने घेतली आघाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुद्रा योजनेमुळे देशातील लहान व्यावसायिकांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली आहे. देशात 2016-17 मध्ये देशातील लहान आणि मध्यम उद्योगांची संख्या 4.53 कोटी होती. ती 2017-18 मध्ये ही संख्या 6.33 कोटींवर पोहचली. तज्ञांच्या मते ऑनलाइन रजिस्‍ट्रेशन आणि मुद्रा योजनेमुळे हे घडले आहे. बिहारने यात आघाडी         घेतली असून हे राज्य नंबर एकवर आहे. तर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यांना मागे सोडत बिहारने हे यश मिळवले आहे.

 

 

मंत्रालयातून जारी करण्यात आलेला अहवाल
मिनिस्ट्री ऑफ एमएसएमईने नुकताच वार्षिक अहवाल जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की सरकारने उचललेल्या पावलांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

 

 

कोणत्या राज्यात किती व्यावसायिक
वार्षिक अहवालानुसार, सगळ्यात जास्त मध्यम उद्योग उत्तर प्रदेशात आहेत. तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 2016-17 च्या अहवालानुसार उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2017-18 च्या अहवालानुसार 10 राज्यातील मध्यम आकाराच्या उद्योगांची संख्या अशी आहे. 

 

 

उत्‍तर प्रदेश : 89.99 लाख 
पश्चिम बंगाल : 88.67 लाख 
तामिळनाडू : 49.48 लाख 
महाराष्‍ट्र : 47.78 लाख 
कर्नाटक : 38.34 लाख 
बिहार : 34.46 लाख 
आंध्र प्रदेश : 33.87 लाख 
गुजरात : 33.16 लाख 
राजस्‍थान : 26.87 लाख 
मध्‍य प्रदेश : 26.74 लाख 
अन्‍य राज्‍य : 164.52 लाख 
एकुण : 633.38 लाख 

 

बिहारने घेतली आघाडी
2017-18 च्या वार्षिक अहवालात बिहार सहाव्या क्रमांकावर आहे. तर गतवर्षी बिहारला टॉप 10 मध्ये जागा मिळाल्या नव्हत्या.

 

काय आहे कारण
इंटिग्रेटेड असोसिएशन ऑफ मायक्रो, स्मॉल अॅण्ड मीडियम एंटरप्रायझेसचे अध्यक्ष राजीव चावला म्हणाले की, एमएसएमईची संख्या वाढण्याची दोन कारणे आहेत. एक केंद्र सरकारने उद्योग आधारित मेमोरेंडम (यूएएम) अंतर्गत ऑनलाईन रजिस्ट्रेशनची व्यवस्था सुरु केली आहे. त्याचा मोठा फायदा एमएसएमई सेक्टरला पोहचला आहे. कारण यापूर्वी उद्योगांचे रजिस्ट्रेशन सहज होत नव्हते. पण आता रजिस्ट्रेशन खूप सहज होत आहे. दुसरे कारण म्हणजे मोठ्या संख्येने लहान उद्योगांना कर्ज देण्यात आले. यामुळे अशा उद्योगांची संख्या वाढली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...