Home | Business | Industries | planning a trip to switzerland in budget

असे करा स्वस्तात स्विझरलॅंड फिरण्याचे प्लॅनिंग, तुम्हाला राहणार नाही टेन्शन

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 19, 2018, 10:15 AM IST

चित्रपटामध्ये तुम्ही अनेकदा स्विझरलॅंडची दृश्ये पाहिली असतील. तु्मची तिथे जाण्याचीही इच्छा असेल पण अनेकदा तु

 • planning a trip to switzerland in budget
  यश राज यांच्या चित्रपटामधील स्विझरलॅंडची दृश्ये.

  नवी दिल्ली- चित्रपटामध्ये तुम्ही अनेकदा स्विझरलॅंडची दृश्ये पाहिली असतील. तु्मची तिथे जाण्याचीही इच्छा असेल पण अनेकदा तुम्हाला ते शक्य वाटत नसेल. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कसे तुम्ही स्वस्तात स्विझरलॅंड फिरुन येऊ शकता.

  स्विझरलॅंडला जाण्यासाठी किती खर्च?
  स्विझरलॅंडमध्ये जवळपास 19 विमानतळे आहेत. स्विझरलॅंडच्या बर्न, जिनिव्हा आणि ज्यूरिख या विमानतळांसाठी भारतातून थेट सेवा आहे. या ठिकाणी जाण्याचा खर्चही वेगवेगळा आहे. राजधानी बर्नचे भाडे हे अन्य शहरांपेक्षा अधिक आहे. अशा वेळी तुम्ही जेनेवा आणि ज्यूरिखची फ्लाईट पकडून 25-30 हजार रुपये वाचवू शकता.

  स्विझरलॅंडला दिल्लीहून हवाई तिकीट
  - दिल्लीहून स्विझरलॅंडची राजधानी बर्नला कमीत कमी रिटर्न एअरफेअर प्रती व्यक्ती 72,782 रुपये आहे.
  - दिल्लीहून ज्यूरिखपर्यंतचे कमीत कमी रिटर्न एअरफेअर 44,583 रुपये आहे.
  - दिल्लीहून जिनिव्हापर्यंतचे कमीत कमी रिटर्न एअरफेअर 40,882 रुपये आहे.

  पुढे वाचा: स्विझरलॅंडमध्ये कसे बुक कराल हॉटेल...

 • planning a trip to switzerland in budget

  जिनिव्हा शहरामधील हॉटेल, हॉस्टेल


  स्विझरलॅंडची जीवनावश्यक खर्च (कॉस्ट ऑफ लिव्हिंग) हा बराच जास्त आहे. याची जाणीव तुम्हाला हॉटेल आणि प्रवासादरम्यान होते. त्यामुळे याठिकाणी जाताना तुम्हाला स्मार्ट प्लॅनिंग करावे लागते. तुम्ही हॉटेलऐवजी अपॉर्टमेंट, हॉस्टेल किंवा ब्रेड अॅण्ड ब्रेकफास्टचे ऑप्शन बुक करु शकता. स्विझरलॅंडमधील जिनिव्हा शहरातील बजेट हॉटेलचे एका रात्रीचे भाडे 10,000 रुपये आहे. जर तुम्ही हॉस्टेलवर राहिलात तर तुम्हाला 6,824 रुपये मोजावे लागतील. ब्रेड आणि ब्रेकफास्ट प्रॉपर्टीमध्ये राहिलात तर तुम्हाला 7,500 रुपये मोजावे लागतील. ज्यूरिखमध्ये हॉस्टेल, ब्रेड आणि ब्रेकफास्ट प्रॉपर्टीमध्ये राहण्यासाठी तुम्हाला 3,700 रुपये मोजावे लागतील.

   

   

  सोर्स-Goibibo, Trivago, Expedia

 • planning a trip to switzerland in budget

  असे आहे स्विझरलॅंडचे टूर पॅकेज

   

  स्विझरलॅंडचे टूर पॅकेज- 1,28,000 रुपये

   

  पॅकेज - 7 दिवस आणि 6 रात्री

   

  कॉक्स आणि किंग सात दिवसांचे  स्विझरलॅंडचे टूर पॅकेजचे ऑफर करत आहे. हे टूर पॅकेज दिल्लीहून असून यासाठी 1,28,000 रुपये शुल्क आकारण्यात येते. या टूर पॅकेजमध्ये रिटर्न एअरफेअर, हॉटेल, ब्रेकफास्ट, ओव्हरसीज प्रवास विमा, लोकल मॅनेजर सर्व्हिस, कोच टूर्स, ट्रान्सफर, एंट्री फी, साईटसीन आणि लोकल ट्रान्सपोर्ट, एअरपोर्ट टॅक्स, शेनजेन व्हिसा चार्जेस याचा समावेश आहे. हे टूर पॅकेज केवळ एका व्यक्तीसाठी आहे. तुम्ही 2 व्यक्ती आणि एक लहान मुल असेल तर तुम्हाला 3,66,000 रुपये टूर पॅकेजसाठी द्यावे लागतील.

Trending