Home | Business | Industries | relationship becomes difficult when a member sues association coai dg

अंबानीविरोधात कोर्टात लढणार मैथ्‍यूज, माफी मागण्यास दिला नकार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 05, 2018, 06:55 PM IST

सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (COAI) महानिदेशक (DG) राजन मैथ्‍यूज यांनी जिओच्या विरोधात आपली भूमिका

 • relationship becomes difficult when a member sues association coai dg

  नवी दिल्ली- सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (COAI) महानिदेशक (DG) राजन मैथ्‍यूज यांनी जिओच्या विरोधात आपली भूमिका कायम ठेवली आहे. मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनीने दिल्ली हायकोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्याबात मैथ्यूज म्हणाले की, हा वाद चर्चेद्वारे सोडविण्यात येऊ शकत होता. पण जिओने कोर्टात धाव घेत चिघळवला आहे.

  यामुळे संबंध होतात खराब
  मैथ्‍यूज म्हणाले, जेव्हा एखादी सदस्य कंपनी आपल्या असोसिएशनच्या विरोधात दावा दाखल करते तेव्हा आपले संबंध खराब होतात. या दाव्याबाबत COAI कायदेशीर सल्ला घेत आहे.

  काय आहे प्रकरण?
  फेब्रुवारीत मैथ्यूजने टेलिकॉम रेग्यूलेटरी अॅथोरेटी म्हणजेच ट्रायने जिओची मदत केल्याचा आरोप लावण्यात आला होता. मैथ्‍यूज म्हणाले की, जिओला फायदा पोहचविण्यासाठी ट्रायने आपल्या नियमांमध्ये बदल केले. COAI ने जिओला बॅक डोअर ऑपरेटर म्हटले होते. त्यानंतर जिओने मैथ्यूज आणि COAI ला माफी मागण्याची नोटीस पाठवली होती. माफी न मागितल्याने जिओने COAI आणि मैथ्यूज यांच्याविरोधात दावा दाखल केला. दिल्ली उच्च न्यायालयाने कंपनीचा अर्ज स्वीकारत COAI आणि मैथ्‍यूज यांच्या विरोधात नोटीस जारी केली.

  ट्रायने काय केले होते.
  COAI ने आरोप लावला होता की, दीड वर्षात ट्रायने अशी अनेक पावले उचलली ज्यामुळे नव्या ऑपरेटर्सचा फायदा झाला. सगळ्यात जास्त वाद हा ट्रायच्या प्रीडेट्री प्रायझिंगवरुन झाला होता. ट्रायने इंटर कनेक्टिक यूजेज चार्ज कमी करुन 14 पैसे प्रती मिनिट केला होता. हा चार्ज ऑपरेटिग कंपनी त्या कंपनीला देते ज्यावर कॉल समाप्त होतो. एअरटेल, आयडिया, व्होडाफोनचा आरोप आहे याचा थेट फायदा जिओला झाला.

Trending