आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून सेल: AC, LED, वॉशिंग मशीनवर रिटेलर्सकडून 50% डिस्काउंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
AC, LED, वॉशिंग मशीनवर रिटेलर्सकडून मान्सून सेल. - Divya Marathi
AC, LED, वॉशिंग मशीनवर रिटेलर्सकडून मान्सून सेल.

नवी दिल्ली- मान्सूनचे आगमन झाल्याने बाजारात AC सारख्या वस्तूंची मागणी घटली आहे. रिटेलर्सने ही घटलेली मागणी लक्षात घेऊन मान्सून सेल सुरु केला आहे. अशा वेळी तुम्ही कमी किंमतीत एसी, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन खरेदी करु शकता. विजय सेल्स, सरगम, क्रोमा सारखे ऑफलाईन रिटेलर्स स्टॉक क्लिअर करण्यासाठी 50% डिस्काउंट देत आहेत. रिटेलर्स हा डिस्काउंट सेल 30 जून पर्यंत सुरु ठेवणार आहेत. 

 

 

रिटेलर्स देत आहेत डिस्काउंट
मल्टीब्रॅण्ड कन्झ्युमर ड्युरेबल रिटेल स्टोअर विजय सेल्सचे एमडी निलेश गुप्ता यांनी दिव्य मराठीला सांगितले की, मान्सून दाखल झाल्याने काही वस्तूंना मागणी घटली आहे. त्यामुळे आम्ही डिस्काउंट देऊन या वस्तूंना मागणी वाढावी असा प्रयत्न करत आहोत. आम्हाला आमचा स्टॉक क्लिअर करायचा आहे. विजय सेल्स एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह सारख्या वस्तूंवर 10 ते 50 टक्के डिस्काउंट देत आहे. हे डिस्काउंट केवळ जुन्या स्टॉकवर आहे. ही सूट केवळ 30 जून मिळणार आहे.

 

 

ग्राहकांसाठी खरेदीचा बेस्ट टाईम
मल्टीब्रॅण्ड कन्झ्युमर ड्युरेबल रिटेल स्टोअर सरगमचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, आम्ही ग्राहकांना 10 ते 36 टक्के डिस्काउंट देत आहोत. आम्ही एसीवर सर्वाधिक डिस्काउंट देत आहोत. ही सूट जुन्या वस्तूंवर आहे. जे प्रोडक्ट बंद होणार आहेत त्यावर अधिक सूट आहे.

 

 

पुढे वाचा: मिळत आहे किती डिस्काउंट
 

 

बातम्या आणखी आहेत...