Home | Business | Industries | some interesting facts about isha ambani

ईशा अंबानींच्या या आहेत काही खास गोष्टी ज्या तुम्हाला नसतील माहिती

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 07, 2018, 03:34 PM IST

मुकेश आणि नीता अंबानी यांच्या मुलीचे म्हणजेच ईशा अंबानीचे लग्न ठरले आहे. ईशा ही आता पिरामल घराण्याची सून होण

 • some interesting facts about isha ambani

  नवी दिल्ली- मुकेश आणि नीता अंबानी यांच्या मुलीचे म्हणजेच ईशा अंबानीचे लग्न ठरले आहे. ईशा ही आता पिरामल घराण्याची सून होणार आहे. पिरामल एंटरप्रायझेसचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत त्या विवाहबध्द होणार आहेत.

  रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळात सामील ईशा अंबानी बिझनेसमधील स्टायलिश आयकॉन म्हणून ओळखल्या जातात. मुकेश अंबानी हे देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर ईशा देशातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची मुलगी आहे. त्यांचे नाव फोर्ब्सच्या यादीत बिलेनिअर उत्तराधिकारी म्हणून सामील करण्यात आलेले आहे. चला जाणून घेऊ यात ईशा अंबानी यांच्याबाबतचे काही इंटरेस्टिंग फॅक्टस-

  येथे घेतले शिक्षण
  - ईशा अंबानी यांनी येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशियाई क्षेत्राचा अभ्यास या विषयात पदवी प्राप्त केली आहे. त्या जून महिन्यापर्यंत स्टॅनफोर्डच्या ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिझनेसमधून बिझनेसमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन प्रोग्राममध्ये मास्टर्स करतील. ईशाने मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्म मॅकेन्झी अॅण्ड कंपनीत बिझनेस अॅनालिस्ट म्हणून काम केले आहे.

  रेंज रोवर चालवितात
  - ईशा या गाडी कमीच चालवतात. त्यांना अनेक वेळा रेंज रोवर वोग लक्झरी SUV त पाण्यात आले आहे. त्यांची ही एसयूवी एस-क्लास आहे. त्याची किंमत जवळपास 3.89 कोटी रुपये आहे.

  2014 मध्ये निगडित झाल्या जिओसोबत
  - ऑक्टोबर 2014 मध्ये ईशा अंबानी यांना रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सामील करण्यात आले.

  पुढे वाचा: AJIO च्या ब्रॅन्डिंग आणि मॅनेजमेंटसोबतही आहे नाते...

 • some interesting facts about isha ambani

  सुरू केले ऑनलाइन फॅशन रिटेल AJIO


  AJIO फॅशन सेग्मेंटमध्ये इंडियन ई-कॉमर्स कंपनी आहे. ही रिलायन्स रिटेलची उपकंपनी आहे. ईशा अंबानी या AJIO च्या ब्रॅन्डिंग आणि मॅनेजमेंटचे काम पाहतात. रिलायन्स इंडस्ट्रीजने एप्रिल 2016 मध्ये AJIO ला लॉन्च केले. या ऑनलाईन फॅशन रिटेलरच्या लॉन्चिंगमागे ईशा अंबानी होत्या. कंपनीचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे.

   

   

  पुढे वाचा: वयाच्या 17 व्या वर्षी फोर्ब्सच्या यादीत झळकले होते नाव...

 • some interesting facts about isha ambani

  फोर्ब्‍समध्ये मिळाले स्थान 
  फोर्ब्सच्या वतीने ईशा अंबानी यांना वयाच्या 23 व्या वर्षी 2015 मध्ये आशियातील ‘12 पॉवरफुल अपकमिंग बिझनेसवुमन’ मध्ये सामील करण्यात आले. त्या 2008 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी 4,710 कोटी रुपयांच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या ‘यंगेस्‍ट बिलेनियर एरिस’ लिस्‍टमध्ये दुसऱ्या नंबरवर होत्या.

   

  पुढे वाचा: आकाशची जुळी आहे ईशा

 • some interesting facts about isha ambani

  ईशा आणि आकाश आहेत जुळे
  ईशा अंबानी आणि आकाश हे जुळे भाऊ-बहिण आहेत. अनंत अंबानी हे ईशा अंबानीपेक्षा लहान आहेत.

   

   

  पुढे वाचा: ईशाकडूनच मिळाली होती जिओची आयडिया...

 • some interesting facts about isha ambani

  ईशाकडूनच मुकेश अंबानींना मिळाली होती जिओची आयडिया
  - मुकेश अंबानी हे ईशामुळेच टिलिकॉम व्यवसायात उतरले. अंबानी यांनी लंडन येथे आयोजित एखा पुरस्कार समारंभात ही बाब सांगितली. त्यांनी सांगितले की आपल्याला ईशाला आलेल्या एका प्रॉब्लेममुळे जिओची आयडिया सुचली आणि त्यांनी टेलिकॉम बिझनेसमध्ये पाऊल ठेवले. ईशा ही अमेरिकेतील येल विद्यापीठात शिकत होती आणि भारतात आली होती. या दरम्यान ईशा आपले एक कोर्सवर्क सबमिट करायचे होते. पण इंटरनेटच्या धीम्या गतीचा त्यांना त्रास होत होता. ईशाने ही बाब आपल्या वडिलांना सांगितले आणि अशा रितीने जिओचा जन्म झाला.  

   

Trending