सुरू करा हा बिझनेस, दरमहा 50 हजार रुपयांचे उत्पन्न
भारतीय जेवणाचा डाळ हा एक अविभाज्य घटक आहे. तुम्ही डाळीचा व्यवसाय करुन दरमहा 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवू श
-
नवी दिल्ली- भारतीय जेवणाचा डाळ हा एक अविभाज्य घटक आहे. तुम्ही डाळीचा व्यवसाय करुन दरमहा 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतात.
सुरू करा डाळींचा बिझनेस
डाळींचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या परिसरात डाळींची किती दुकाने आहेत याची माहिती घ्या. यामुळे तुम्हाला हा व्यवसाय करणे योग्य आहे की नाही हे लक्षात येईल.पाहिजे हे लायसन
- दुकान चालविण्यासाठी किंवा बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे जीएसटी नंबर पाहिजे. जीएसटी नंबर तुम्हाला जीएसटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यावर मिळेल. खुली डाळ आणि प्लॅस्टिक पॅक डाळीवर जीएसटी नसतो. ब्रॅंन्डेड डाळ विकण्यावर 5 टक्के जीएसटी आहे.
- जर तुम्ही भाड्याचे दुकान चालवत असाल तर तुमच्याकडे भाडेकरार असावा. एमसीडीकडून दुकान चालविण्याचे लायसनही घ्यावे लागेल.
- खाद्य परवाना तुम्ही एफएसएसएआयएसकडून घेऊ शकता.पुढे वाचा: कुठे मिळू शकतात डाळी
-
सुरु करा डाळींचा व्यवसाय.
मिलमधुन खरेदी करु शकता डाळ
राज्यात डाळीच्या मिल आहेत ज्या पॉलिश डाळ होलसेल आणि रिटेल बाजारात सप्लाय करु शकतात. याची माहिती तुम्हाला जस्ट डायल सारख्या सर्च इंजिन आणि ऑनलाईन सर्चद्वारे मिळू शकते. दिल्ली-एनसीआरमध्ये नरेला आणि बादली इंडस्ट्रियल एरियामध्ये डाळीच्या अनेक मिल आहेत. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करुन डाळी मागवू शकता.होलसेल बाजारातून करा डाळ खरेदी
तुम्ही होलसेल बाजारातून डाळी मागवू शकता. तुम्ही डाळी इंपोर्टरकडून खरेदी करु शकता. याची माहिती ऑनलाईन मिळू शकते. इंडिया पल्सेस आणि ग्रेन असोसिएशनच्या वेबसाईटवरही याची सगळी माहिती किंमतीसोबत मिळेल.पुढे वाचा: किती करावी लागेल गुंतवणूक
-
गुंतवणुक आणि कमाई
खारी बावली याठिकाणी डाळींचा होलसेल व्यवसाय करणारे सतिंदर जैन यांनी सांगितले की, डाळींचा व्यवसाय 5 लाख रुपयांच्या गुंतवणूकीने सुरु करता येऊ शकतो. 5 लाख रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे तुम्ही दरमहा 40 से 50 हजार रुपये सहज कमावू शकता. जैन म्हणाले की, डाळ किंवा अन्न-धान्य विकून तुम्ही रोज 1,500 ते 2,000 रुपये कमावू शकता.किती मार्जिन
होलसेल बाजार किंवा मिलकडून तुम्ही रिटेलमधुन 100 रुपयांची खरेदी केल्यास तुम्हाला 10 ते 25 रुपयांचे मार्जिन मिळू शकते.निर्माण करु शकता स्वत:चा ब्रॅन्ड
तुम्ही पॅकेजिंग मशीन खरेदी करुन स्वत:चा डाळीचा ब्रॅन्ड तयार करुन विकू शकता. डाळींचा दर्जा चांगला असल्यास दीर्घकाळात तुम्हाला याचा फायदा होईल.ऑनलाईनही विकू शकता डाळी
स्वत:चा डाळीचा ब्रॅन्ड तयार केल्यास तुम्ही बिग बास्केट, अमेझॉन पॅन्ट्री सारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही डाळी विकू शकता.