आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TATA देत आहे बेरोजगारांना संधी, प्रत्येक वर्षी 1 लाख लोकांना होणार फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कमकुवत घटकांच्या मदतीला धावणाऱ्या टाटा ग्रुपने प्रत्येक वर्षी १ लाख बेरोजगारांना व्यवसायाला अनुकूल करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी संपूर्ण देशात ट्रेनिंग सेंटर उघडण्यात येणार आहेत. टाटा ट्रस्टचे म्हणणे आहे, की सध्या २० हजार बेरोजगारांना प्रत्येक वर्षी ट्रेनिंग दिले जात आहे. दोन वर्षांपूर्वी हा कार्यक्रम आखण्यात आला होता. आता १ लाख बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. २०२१ पर्यंत १० कोटी लोकांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडवून आणण्याचे टाटा ग्रुपने ठरवले आहे.

 

१ लाख बेरोजगारांना ट्रेनिंग
टाटा ट्रस्टचे नॉर्थ ईस्ट विभागाचे प्रमुख विश्वनाथ सिन्हा यांनी सांगितले, की आता आम्ही प्रत्येक वर्षी १ लाख लोकांना ट्रेनिंग देण्याचा संकल्प केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांसोबत मिळून टाटा ग्रुप यासाठी काम करत आहे. सध्या आमचे देशभरात १२ ट्रेनिंग सेंटर आहेत. त्यातून आतापर्यंत २० हजार बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील १ हजार तरुण नॉर्थ ईस्टचे होते.

 

रोजगाराला चालना देणार
टाटा ट्रस्ट आंथ्रप्रेन्युरना व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करणार आहे. हा कार्यक्रम जास्तीत जास्त ग्रामीण भागात राबविला जाईल. ट्रस्टचे टार्गेट आहे, की प्रत्येक वर्षी ५ हजार मॅक्रो आणि मायक्रो इंटरप्रायजेस तयार करणे. त्यांना सर्वप्रकारे मदत करणे. पहिल्या वर्षी असे २ हजार युनिट्स डेव्हलप करण्यात आले.

 

पुढील स्लाईडवर वाचा, टाटाने अशी केली ३० हजार कुटुंबांना मदत...

बातम्या आणखी आहेत...