Home | Business | Industries | the hand of the Indian CEO behind Walmart big success of behind 1 lakh crores deal

1 लाख कोटीच्या डीलमागे आहे या भारतीयाचा हात, वॉलमार्टने दिली आहे ऑफर

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 11, 2018, 12:03 AM IST

वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टच्या डीलनंतर सगळ्यात जास्त कल्याण कृष्णमुर्ती याचे नाव चर्चेत आहे. कल्याण कृष्णमुर्ती

 • the hand of the Indian CEO behind Walmart big success of behind 1 lakh crores deal

  नवी दिल्ली- वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टच्या डीलनंतर सगळ्यात जास्त कल्याण कृष्णमुर्ती याचे नाव चर्चेत आहे. कल्याण कृष्णमुर्ती यांना जानेवारी 2017 मध्ये फ्लिपकार्टचे सीईओ बनविण्यात आले होते. त्यावेळी कंपनीचे वॅल्यूएशन कमी होत होते. तर अमेझॉनकडून कंपनीला मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागत होते. अशा स्थितीत कल्याण कृष्णमुर्ती यांनी कंपनीला कारभार सांभाळला आणि फंड आणण्यासोबतच अनेक कठोर निर्णयही घेतले. आपल्या कार्यकाळात त्यांनी कंपनीला देशातील सगळ्यात यशस्वी ई-कॉमर्स वेबसाइट बनवले. त्यामुळेच आज वॉलमार्टसोबत एक लाख कोटीची डील झाली आहे.

  4 वर्षात फ्लिपकार्टला बनवले नंबर-1
  - कल्याण कृष्णमुर्ती यांनी 2013 मध्ये चीफ फायनॅशियल ऑफिसर म्हणून फ्लिपकार्ट जॉईन केले. त्यानंतर सचिन यांनी सीईओ पद सोडले. जानेवारी 2017 मध्ये कृष्‍णमूर्ती‍ यांना कंपनीचे सीईओ बनविण्यात आले. हा तो काळ होता जेव्हा अमेझॉन चीनमध्ये अलीबाबाच्या मागे पडली होती. त्यामुळे अमेझॉनने भारतात अतिशय अॅग्रेसिव्ह स्ट्रटर्जी हाती घेतली होती. अमेझॉनने लोकांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी जवळपास 5.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. कृष्णमुर्ती यांनी अवलंबलेली नवी पॉलिसी आणि टॉप मॅनेजमेंट लेवलवर केलेले बदल यामुळे फ्लिपकार्ट 4 वर्षात अमेझॉनला मागे सोडत पहिला क्रमाक मिळवला.

  पुढे वाचा: भारतीयांची काय आहे ईच्छा

 • the hand of the Indian CEO behind Walmart big success of behind 1 lakh crores deal

  भारतीयांची काय आहे इच्छा
  सीईओ झाल्यानंतर कृष्णमुर्ती यांनी नव्या कल्पना अवलंबल्या त्यांनी नवे धोरण स्वीकारले. त्यांनी भारतीयांच्या सवयींचा अतिशय बारकाईने अभ्यास केला. ऑनलाईन ट्रॅफिक आणि सेल्ससाठी नवे लक्ष्य निर्धारित केले. कृष्णमुर्ती यांनी त्याला 80-20 नियम असे म्हटले. त्यांच्या लक्षात आले होते कंपनीच्या महसुलापैकी 80 टक्के हिस्सा हा 20 टक्के कॅटिगिरीतून येतो. यात मोठी उपकरणे, फॅशन आणि मोबाईल फोनचा समावेश आहे. 

   

   

  पुढे वाचा: काय आहे सगळ्यात मोठे यश

 • the hand of the Indian CEO behind Walmart big success of behind 1 lakh crores deal

  वॉलमार्टमध्येही असतील सीईओ
  एका मुलाखतीत 2017 मध्ये कृष्णमुर्ती यांनी ब्लूमबर्गला सांगितले की, आम्ही जाणून घेतले की भारतीयांना काय ऑनलाईन खरेदी करण्यास आवडते. त्यामुळे वॉलमार्टने त्यांना सीईओपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Trending