Home | Business | Industries | these books make you rich and success

श्रीमंत होण्याचे रहस्य लपले आहे या 6 पुस्तकांमध्ये, वॉरेन बफेंचीही आवडती आहेत ही पुस्तके

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 09, 2018, 12:06 PM IST

यशस्वी आणि श्रीमंत होण्याचा कोणताही फिक्स फॉ

 • these books make you rich and success

  नवी दिल्ली- यशस्वी आणि श्रीमंत होण्याचा कोणताही फिक्स फॉर्मूला नाही. असे म्हणतात तुमची मेहनत, जिद्द, समजुतदारपणा आणि भाग्य याद्वारे तुम्ही यशस्वी आणि श्रीमंत होता. काही लोक खूप मेहनत करतात पण श्रीमंत होत नाहीत. तर काही जण कमी मेहनत करतात आणि अतिशय कमी वेळेत श्रीमंत होतात. याचाच अर्थ यशस्वी होण्यासाठी मेहनतीसोबतच काही आणि घटकही काम करतात.

  जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर काही गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. वॉरेन बफे यांच्या काही आवडत्या पुस्तकांविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. चला जाणून घेऊ यात अशा 6 पुस्तकांविषयी...

  1. The Little Book of Common Sense Investing (गुंतवणूकीविषयीत महत्वपुर्ण बाबी)

  लेखक: जॉन सी बोगले

  काय आहे खास- हे पुस्तक तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कुठे पैसे गुंतवावेत याविषयी माहिती देते. अशा पध्दतीने गुंतवणूक करुन तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

  पुढे वाचा: पुस्तकात लपले आहे श्रीमंत होण्याचे रहस्य

 • these books make you rich and success

  2. How Rich People Think (श्रीमंत लोक कसा विचार करतात) 
   
  लेखक: स्‍टीव सेईबोल्‍ड

  काय आहे खास- लेखक स्‍टीव सेईबोल्‍ड यांनी हे पुस्तक जवळपास 1 हजार श्रीमंत व्यक्तींची मुलाखत घेऊन लिहिले आहे. त्यांचा अनुभव तुम्हाला बरेच काही देऊन जातो.
   

   

  पुढे वाचा: या पुस्तकात लपले आहे श्रीमंत होण्याचे रहस्य

 • these books make you rich and success

  3. Rich Habits: The Daily Success Habits of Wealthy Individuals (श्रीमंतांच्या सवयी: श्रीमंतांच्या रोजच्या यशस्वी होण्याच्या सवयी) 
   
  लेखक: थॉमस कोर्ली

   
  काय आहे खास- श्रीमंत आणि गरीब लोकांवर जवळपास 5 वर्ष संशोधन करुन त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक वाचून तुम्ही त्या सवयी आत्मसात करु शकता ज्या तुम्हाला श्रीमंत करतील.

   

   

  पुढे वाचा: या पुस्तकात लपले आहे श्रीमंत होण्याचे रहस्य

 • these books make you rich and success

  4. Think and Grow Rich (विचार करा आणि श्रीमंत व्हा) 
   
  लेखक: नेपोलियन हिल
   
  काय आहे खास-
  माजी अमेरिकी राष्‍ट्रपती रूजरवेल्‍ट यांचे सल्लागार असणाऱ्या नेपोलियन हिलने हे पुस्तक जवळपास 500 यशस्वी व्यक्तींसोबत चर्चा करुन लिहिले आहे. या पुस्तकातून तुम्हाला श्रीमंत लोक कसा विचार करतात यांची माहिती मिळू शकते. हिल यांनी श्रीमंत होण्याविषयीच्या 6 गोष्टींविषयी सांगितले आहे. 


  पुढे वाचा: पुस्तकात वाचा श्रीमंत होण्याचे रहस्य...

 • these books make you rich and success

  5. The Thin Green Line: The Money Secrets of the Super Wealthy (लहान हिरवी रेषा: गर्भश्रीमंतांचे मनी सिक्रेट्स) 
   
  लेखक: पाल सुलिवैन
  काय आहे खास- हे पुस्तक गर्भश्रीमंत आणि  श्रीमंतांमधील अंतर दर्शवते. या पुस्तकातून तुम्ही श्रीमंत झाल्यानंतरचे आणि पुस्तक होण्याचे गुण शिकू शकता. 

   

  पुढे वाचा: या पुस्तकात लपले आहे श्रीमंत होण्याचे रहस्य

   

 • these books make you rich and success

  6. I Will Teach You To Be Rich (मी तुम्हाला शिकवतो, तुम्ही सुध्दा श्रीमंत होऊ शकता) 
   
  लेखक: रामित सेठी
  काय आहे खास- हे असे पुस्तक आहे जे तुम्हाला पर्सनल फायनान्सच्या आधारे श्रीमंत होण्याचे गुण शिकवते. लेखक रामित सेठी हे स्वत: सुध्दा अॅथोप्रेन्‍योनर होते. 

Trending