आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानीपेक्षा 19 पटींनी श्रीमंत आहे हा उद्योजक, वर्षातील 250 दिवस राहतो विमानात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  ८१ वर्षाच्या या उद्योजकाला पैशाने पैसा बनविण्यासाठी ओळखले जाते. हेच कारण आहे, की जगभरातील गुंतवणुकदार यांच्या सल्ल्यावर अब्जावधी रुपये लावतात. या उद्योजकाचे नाव आहे जोसेफ मार्क मोबियस. ते सध्या ४८ लाख कोटी (७४० अब्ज डॉलर) रुपयांचे मालक आहेत. अशा प्रकारे जोसेफ अंबानीपेक्षा किती तरी पटींनी श्रीमंत आहेत. आता जोसेफ रिटायर्ड होणार आहेत.

 

मुकेश अंबानी यांच्यापेक्षा १९ पट जास्त संपत्ती
जोसेफ मार्क मोबियस जगातील अग्रणी फंड मॅनेजर फ्रॅंकलिन टेम्पलटन इनव्हेस्टमेंटचे एग्झिकेटिव्ह चेअरमन आहेत. जगभरातील गुंतवणुकदार त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्याकडे एकूण ४८ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्याशी तुलना केली तर त्यांच्याकडे १९ पटींनी जास्त संपत्ती आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार सध्या मुकेश अंबानी यांची पर्सनल वेल्थ २.६ लाख कोटी रुपये आहे.

 

म्हटले जाते मार्केट गुरु
जोसेफ मार्क मोबियस यांना मार्केट गुरु म्हटले जाते. आफ्रिका, आशिया, पूर्व युरोप आणि लॅटिन अमेरिका या भागात यांची मोठी गुंतवणूक आहे. येथे गुंतवणूक करण्यापूर्वी जोसेफ यांचा सल्ला घेतला जातो. त्यांना पाइड पाइपर ऑफ इमर्जिंग मार्केट, ग्लोबट्रॉटर या नावांनीही ओळखले जाते.

८० वर्षांचा हा उद्योजक या वर्षी जानेवारीत रिटायर्ड होणार असल्याचे त्यांच्या कंपनीने जाहीर केले आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा, विमानात २५० दिवस राहते हा उद्योजक... वाचा काय आहे सक्सेसमंत्र...

बातम्या आणखी आहेत...