आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 लाख विद्यार्थ्यांना शिकवतो हा ट्युटर, तब्बल 260 कोटी रुपये आहे इन्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गावातून शिक्षण घेणाऱ्या या ट्युटरने टॅलेंटच्या बळावर चांगली नोकरी मिळवली. त्यानंतर फॅट सॅलरीची नोकरी सोडून स्वतःचा कोचिंग क्लास सुरु केला. आज हा क्लास एवढा मोठा झाला आहे, की विद्यार्थ्यांची संख्या ४० लाखांवर गेली आहे. आता त्यांची ही कोचिंग प्रॅक्टिस मोठ्या कंपनीत रुपांतरीत झाली आहे. त्यांनी जगात आपले नाव कमवले आहे. या ट्युटरचे नाव आहे बायजू रविंद्रन. ऑनलाईन एज्युकेशन स्टार्टअपचे बायजूचे ते फाऊंडर आहेत. कोचिंगच्या बळावर बायजू यांचे वार्षिक उत्पन्न २६० कोटी रुपयांवर गेले आहे.

 

नोकरी सोडून २ लाख रुपयांनी सुरु केले होते कोचिंग

 

असा सुरु झाला प्रवास
बायजू रविंद्रन यांनी शालेय शिक्षण केरळमधील कन्नूर या जिल्ह्यातील अझीकोड येथून घेतले. इंजिनिअरिंगची डिग्री त्यांनी कालीकल युनिव्हर्सिटीतून घेतली. त्यानंतर शिपिंग कंपनीत नोकरी केली. या दरम्यान इंजिनिअरिंगच्या काही मित्रांना एमबीएच्या परिक्षेसाठी तयारी करण्यात मदत केली. त्यांच्यासाठी टिचिंग सुरु केले. विद्यार्थ्यांना चांगले गुण पडले. तेव्हा मित्रांनी नोकरी न करता कोचिंग क्लास सुरु करण्याचा सल्ला दिला. येथून बायजू यांच्या यशस्वी उद्योगाला सुरवात झाली.

 

२ लाख रुपयांनी सुरु केले कोचिंग
बायजूने केवळ २ लाख रुपयांपासून कोचिंग क्लास सुरु केला होता. त्यानंतर त्यांना जास्त विद्यार्थ्यांना एज्युकेशन प्रोव्हाईड करण्याची एक खास आयडिया आली. त्यांनी २०११ मध्ये बायजू नावाने स्टार्टअप सुरु केले. एज्युकेशन प्रोव्हाईड करणाऱ्या या कंपनीचे वार्षिक उत्पन्न २६० कोटी रुपयांवर गेले आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा, एका आयडियाने कसे बदलले आयुष्य....

बातम्या आणखी आहेत...