आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Business Idea Two Friends Earned 20 Crores From T Shirt Business Now They Will Start An Online Store

Business Idea: मित्र-मैत्रिणीने टी-शर्ट विकून कमवले 20 कोटी रुपये, आता ऑफलाइन स्टोरची तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - अवघ्या 20 वर्षांच्या मित्र-मैत्रिणीने फक्त टी-शर्ट विकून तब्बल 20 कोटी रुपयांचा बिझनेस उभा केला आहे. प्रविण आणि सिंधूजा असे या दोघांचे नाव असून ते नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी (NIFT तामिळनाडू) चे विद्यार्थी आहेत. या दोघांनी ऑललाइन टी-शर्ट विक्री करून हे यश मिळवले. आता हे दोघे आपले ऑफलाइन स्टोर सुरू करण्यच्या तयारीत आहेत. 3 वर्षांपूर्वी त्यांनी यंग ट्रेंड्झ नावाचे टी-शर्ट ब्रँड सुरू केले होते. 250 ते 600 रुपये किंमत असलेल्या टी-शर्टच्या विक्रीतून त्यांनी ही कमाई केली. 
 

शिक्षण घेताना बिझनेस आयडिआ...
यंग ट्रेंड्झचे सह-संस्थापक प्रवीण के. आर. बिहार तर सिंधुजा के. हैदराबाद येथील रहिवासी आहे. ते दोघे एनआयएफटीमध्ये शिकत होते, तेव्हाच त्यांना ही बिझनेसची आयडिआ आली आहे. NIFT मध्ये सातवे सेमिस्टर सुरू असताना त्यांनी आपला बिझनेस सुरू केला. त्यांनी वेबसाइटवर सुद्धा यासंदर्भातील माहिती जारी केली. 2015 मध्ये ऑनलाइन मार्केटने देशभर धूम ठोकली होती. त्याचाच फायदा घेत या दोघांनी ऑनलाइन क्लॉथिंग ब्रँड यंग ट्रेंड्झची सुरुवात केली. 

 
10 लाखांत सुरू केला व्यवसाय
सप्टेंबर 2015 मध्ये त्यांनी 10 लाखांची गुंतवणूक केली होती. पुढील दोन महिने त्यांनी ऑनलाइन मार्केट फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, वूनिक आणि पेटीएमवर त्याची विक्री सुरू केली. यानंतर स्वतःची ई-कॉमर्स वेबसाइट सुरू केली. यंग ट्रेंड्झ ब्रँडने 2017 च्या फेस्टिव्ह सेलमध्ये फ्लिपकार्टवरूनच तब्बल 25 हजार टीशर्ट विकल्या आहेत. 

 
कॉलेज फेस्टिव्हलमध्येही विक्री
सेमिस्टर संपले तेव्हा कॉलेजमध्ये फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये सुद्धा या दोघांनी आपल्या कंपनीचे ब्रँडिंग करत विक्री सुरू केली. सुरुवातीला फक्त 10 टीशर्टची ऑर्डर मिळाली होती. यानंतर आयआयटी आणि आयआय़एममध्ये 100 टीशर्ट विकल्या गेले. 


सोर्स- ही बातमी कंपनीच्या संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...