Home | Business | Industries | unlimited calling for rs 39 bsnl launches new plan to competition with jio

39 रुपयात अनलिमिटेड कॉलिग, Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवा प्लॅन

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 11, 2018, 05:36 PM IST

सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने प्रीपेड ग्राहकांसाठी नवा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅन अंतर्गत 39 रुपयात अनलिम

 • unlimited calling for rs 39 bsnl launches new plan to competition with jio

  नवी दिल्ली- सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने प्रीपेड ग्राहकांसाठी नवा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅन अंतर्गत 39 रुपयात अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहक लोकल आणि एसटीडी व्हॉईस कॉल करु शकतील. याशिवाय तुम्ही रोमिंगमध्येही फ्री कॉलिंग करु शकता. यात तुम्ही दिल्ली आणि मुंबईला सोडून हे कॉलिंग करु शकता. या दोन्ही शहरात एमटीएनएल सेवा देत असल्याने असे घडत आहे.

  प्रीपेड ग्राहकांना मिळणार लाभ
  बीएसएनएलचा हा प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने हा प्लॅन आणला आहे.

  10 दिवसांची असेल वैधता

  या प्लॅनची वैधता 10 दिवस असणार आहे. या 10 दिवसात तुम्ही अनलिमिटेड कॉलिग करु शकता.

  पुढे वाचा...

 • unlimited calling for rs 39 bsnl launches new plan to competition with jio

  बीएसएनएलची फ्री संडे कॉलिंग सेवा
  बीएसएनएलने नुकतीच संडे फ्री कॉलिग सेवा सुरु केली आहे. ही सेवा 30 एप्रिलला बंद होणार होती.

  रात्रीही फ्री कॉलिगची ऑफर
  या सोबत बीएसएनएलने रात्रीचा व्हॉईस कॉल प्लॅनही रिफ्रेश केला आहे. आता युजर्स रात्री साडेदहा ते सकाळी सहा पर्यंत फ्री कॉलिग करु शकतील.

   

  पुढे वाचा: फ्री मिळेल रिंगटोन...

 • unlimited calling for rs 39 bsnl launches new plan to competition with jio

  रिंगटोनही मिळणार मोफत
  या ऑफरमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसोबतच 100 मॅसेज मोफत मिळणार आहेत. याशिवाय तुम्हाला रिंग बॅक ट्यूनही सेट करुन मिळणार आहे. पण यात कोणताही डाटा मिळणार नाही.

Trending