Home
|
Business
|
Industries
|
walmarts acquisition of flipkart rakes in 500 million dollar moolah for flipsters
वॉलमार्ट डीलने फ्लिपकार्टच्या 100 कर्मचाऱ्यांना बनवले करोडपती, 3350 कोटींचा फायदा
दिव्य मराठी वेब टीम | Update - May 10, 2018, 01:15 PM IST
वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टच्या डीलनंतर फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांना जवळपास 50 कोटी डॉलरचा फायदा झाला आहे. वॉलमा
-
नवी दिल्ली- वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टच्या डीलनंतर फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांना जवळपास 50 कोटी डॉलरचा फायदा झाला आहे. वॉलमार्टने फ्लिपकार्टचे जवळपास 77 टक्के शेअर 16 अब्ज डॉलरला खरेदी केले आहेत.
100 हून जास्त कर्मचारी करोडपती
डीलमुळे केवळ कंपनीच नव्हे तर अनेक कर्मचाऱ्यांचाही फायदा झाला आहे. कंपनीचे शेअर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा (ESOP POOL) मोठा फायदा झाला आहे. यात जवळपास 2 अब्ज डॉलर (जवळपास 13,455 कोटी रुपये) किमतीचे शेअर होल्डर सामील आहेत. अशाने कंपनीच्या जवळपास 100 नव्या जुन्या कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे.ESOP पूल प्रकरणातील या टॉप 5 कंपन्या (8 मे 2018)कंपनी मार्केट कॅप वॅल्यूएशन वॅल्यू ऑफ ESOP पूल फ्लिपकार्ट 1,41,261 कोटी रुपये 13,455 कोटी रुपये एचसीएल टेक 1,28,216.91 कोटी रुपये 5,498.45 कोटी रुपये एक्सिस बैंक 1,38,971.35 कोटी रुपये 5,065.42 कोटी रुपये विप्राेे 1,23,187 कोटी रुपये 3,040.60 कोटी रुपये सन फार्मा 1,22,724.20 कोटी रुपये 37.97 कोटी रुपये
वॉलमार्ट देणार 100% बायबॅक ऑफर
- वॉलमार्ट फ्लिपकार्टच्या कर्मचाऱ्यांना शेअर विकण्यासाठी 100% बायबॅकची ऑफर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजुन फ्लिपकार्टने काहीही म्हटलेले नाही.