Home | Business | Industries | want to become successful business follow these 5 rules

#SuccessMantra तुमच्याकडे असेल खूप पैसा, करा हे 5 उपाय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 22, 2018, 12:01 AM IST

तुम्हाला खूप सारा पैसा कमवायचा असेल तर तुम्ही काय कराल? या प्रश्नाचे अतिशय साधे आणि सोपे उत्तर आहे ते म्हणजे

 • want to become successful business follow these 5 rules

  नवी दिल्ली- तुम्हाला खूप सारा पैसा कमवायचा असेल तर तुम्ही काय कराल? या प्रश्नाचे अतिशय साधे आणि सोपे उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही बिझनेसमॅन व्हा. त्यानंतर तुम्ही प्रश्न विचाराल की यशस्वी बिझनेस होण्यासाठी काय करायला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही कारण यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. जगभरातील करियर गुरु आणि ब्लॉगर यशस्वी व्यावसायिक होण्याविषयी वर्षानुवर्षे लिहित आहेत.

  बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे काही खास स्किल असणे गरजेचे असते. हे स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही व्यवसायात सहज यशाचे शिखर गाठता. बिझनेस वेबसाईट इंक डॉटकॉमने नुकतेच आपल्या अहवालात अशाच काही सॉफ्ट स्किलविषयी माहिती दिली आहे.

  चला जाणून घेऊ या अशाच काही सॉफ्ट स्किलविषयी...

 • want to become successful business follow these 5 rules

  नंबर-1: कधीही समजू नका की आपण प्रॉडक्ट विकत आहोत
  - अनेक जण लोक खरेदी करतील असे समजून प्रॉडक्ट लॉन्च करतात. त्यांना वाटते की आपल्या फक्त वस्तू विकायची आहे पण असा विचार करणे चूक आहे. चांगले बिझनेसमॅन असा विचार करत नाहीत. ते लोकांना काही तरी चांगले आणि खास देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही केवळ प्रॉडक्ट विकण्याचा विचार न करता लोकांना काही तरी खास देण्याचा आणि त्यांना स्वत:शी जोडण्याचा प्रयत्न करा.

   

   

  पुढे वाचा: यशस्वी होण्याचा दुसरा मंत्र...  

 • want to become successful business follow these 5 rules

  नंबर-2: दुसऱ्याचा तणाव दुर करण्याचा प्रयत्न करा
  - चांगला व्यावसायिक होण्यासाठी तुम्हाला आपला तणाव कसा दुर करायचा हे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी तुम्हाला तिच्याशी झगडता आले पाहिजे. एवढेच नाही तर तुमच्यासोबत काम करणाऱ्यांचा तणावही तुम्हाला दुर करता आला पाहिजे. तुमच्या ऑफिसमधील वातावरण जास्तीत जास्त कसे टेन्शन फ्री करता येईल याचाही तुम्ही विचार केला पाहिजे.

   

  पुढे वाचा: यशस्वी होण्याचा आणखी एक मंत्र...

 • want to become successful business follow these 5 rules

  नंबर-3 : आव्हानांना सामोरे जा
  - तुम्ही कोणतेही काम करत असाल अथवा व्यवसाय करत असाल तरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नेहमी तयार राहा. तुम्हाला तुमच्या तत्वांना मुरड घालावी लागेल असे प्रसंगही तुमच्यासमोर येतील पण तुम्हाला तुम्ही उत्पादित केलेल्या वस्तूची किंमत माहिती असल्यास तुम्ही या आव्हानाला सहज सामोरे जाल. तुमच्या वस्तूला योग्य मुल्य मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. 
   

  पुढे वाचा: यशस्वी होण्यासाठी आणखी काय करायला हवे

 • want to become successful business follow these 5 rules

  नंबर-4 : केवळ आदेश देणारे होऊ नका
  - अनेकांना केवळ इतरांना ऑर्डर देण्याची सवय असते. पण त्याऐवजी तुम्ही दुसऱ्यांना त्यांचे स्किल, टॅलेंट दाखविण्याची संधी दिली पाहिजे. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यास इम्पॉवर केले पाहिजे. तुम्ही हे ओळखले पाहिजे या कर्मचाऱ्यात काय खास आहे. त्याची यूएसपी काय आहे. कोणती गोष्ट त्यांना प्रेरणा देते. त्यांच्यात काही यूनीकनेस आहे की नाही. एकदा कर्मचारी परिस्थिती हाताळू शकत नसेल तर ती कशी हाताळायची याचे प्रशिक्षणही तुम्ही त्याला द्यायला हवे.

   

  पुढे वाचा: यशस्वी होण्यासाठी हेही करा...

 • want to become successful business follow these 5 rules

  नंबर-5: मैत्री वाढवा कॉन्टेक्टस नको
  - बिझनेस वाढविण्यासाठी तुम्ही नुसते कॉन्टेक्टस वाढवू नका तर लोकांशी मैत्री करा. केवळ कामाच्या गोष्टी न करता त्यांना त्यांच्या स्थितीविषयी विचारा. तुमच्याविषयी त्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे असे तुमचे वर्तन असायला हवे.

Trending