Home | Business | Industries | world richest bill gates parenting tips

बिल गेट्स चिमुकल्यांची करतात अशी देखभाल, म्हणाले यशासाठी होईल फायदाच

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 03, 2018, 10:06 AM IST

जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये सामील असणाऱ्या बिल गेट्स यांनी नुकत्याच पालकत्वाच्या काही टिप्स दिल्या. नुकतेच

 • world richest bill gates parenting tips
  बिल गेट्स आपल्या मुलांसमवेत.

  नवी दिल्ली- जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये सामील असणाऱ्या बिल गेट्स यांनी नुकत्याच पालकत्वाच्या काही टिप्स दिल्या. नुकतेच एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांची पत्नी त्याच्या मुलांची कशी देखभाल करतात. त्यासाठी त्यांनी एका फॉम्युल्याचा वापर केला आहे. त्यांच्या मतानुसार प्रेम आणि तर्काच्या आधारे त्यांना चांगले आई-वडील होण्यास मदत मिळाली. चला जाणून घेऊ या बिल गेट्स यांच्या पॅरेंटिग टिप्स..

  मेलिंडा गेट्स करतात चिमुकल्यांची देखभाल
  बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांना तीन मुले आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मुलांची नावे जेनिफर गेट्स, रोरी जॉन गेट्स आणि फोबे एडेल गेट्स आहेत. जेनिफर सध्या स्टेनफोर्ड विद्यापीठात काम करतात. त्यांचा मुलगा रोरी जॉन गेट्स लेकसाईट स्कूलमध्ये आहे तर त्यांची लहान मुलगी शालेय शिक्षण घेत आहे. मेलिंडा गेट्स या मुलांची देखभाल करतात. बिल गेट्स यांनी हार्वर्डच्या विद्यार्थ्यांना एका मुलाखतीत सांगितले की, मुलांना सांभाळण्याची 80 टक्के जवाबदारी त्यांच्या पत्नीची आहे.

  हे आहे पॅरेंटिंग मॉडेल
  बिल गेट्स म्हणाले की, ते आणि त्यांची पत्नी 1970 च्या पॅरेंटिंग मॉडेलचा वापर करतात. हा फॉर्मूला सायकोलॉजिस्ट आणि शालेय प्रशासनाने मिळवून बनवला आहे. यात इमोशनल कंट्रोल, इमोशनल रिअॅक्शन नियंत्रण या शिकविण्यात येतात. यामुळे मुलांना भावनांवर नियंत्रण ठेवता येते.

  पुढे वाचा: बिल गेट्स यांच्या पॅरेंटिग टिप्सविषयी...

 • world richest bill gates parenting tips
 • world richest bill gates parenting tips

  समस्या सोडविण्यावर भर
  - या मॉडेल अंतर्गत आई-वडील आपल्या मुलांना प्रश्न विचारतात आणि त्यांच्या समस्या दूर करण्यावर भर देतात. त्यांनी आपल्या मुलांना वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत मोबाईल दिलेला नाही. ते आपल्या मुलांसमवेत चर्चमध्ये जातात. त्यांच्या मुलांना त्यांच्या संपत्तीतुन एक कोटी अमेरिकन डॉलर मिळतील. बिल गेट्स यांचे एकुण नेटवर्थ 9,120 कोटी अमेरिकी डॉलर आहे.

   

   

  मुलांवर नाही करत जास्त खर्च
  बिल गेट्स यांच्या मतानुसार त्यांनी आपल्या मुलांना जीवनात काही करण्याचे मर्यादित स्वातंत्र्य दिले आहे. ते आपल्या मुलांवर जास्त खर्च करत नाहीत कारण त्यांनी बाहेर काम करण्यास शिकावे अशी त्यांची इच्छा आहे.  

Trending