आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काहीशी अशी असते iPhone बनवणार्‍यांची लाईफ, आत्महत्येसही मजबूर होतात वर्कर्स!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगप्रसिद्ध 'अॅपल' कंपनीने आता भारतावर लक्षकेंद्रीत केले आहे. 'अॅपल'ने आपला लोकप्रिय iPhone SE 999 रुपयांच्या ईएमआयवरही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षापर्यंत 999 रुपयांच्या हप्त्यांवर हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. iPhoneची विक्री वाढवण्यासाठी कंपनीने नवी शक्कल शोधून काढली आहे. चीनची Foxconn व Pegatron Group अॅपलचा iPhone व iPad असेम्बल करतात.
कमी पगारात वर्कर्सकडून जास्त परिश्रम करून घेते कंपनी...
- Apple iphone निर्मात्या कंपन्या डेली वेजेसवर वर्कर्स हायर करतात. त्यांच्याकडून कमी पगारत प्रचंड मेहनत करून घेतली जाते.
- चीनमध्ये एका आठवड्यात 49 तास काम करण्याचा नियम असतानाही वर्कर्सकडून 66 तासांपेक्षा जास्त वेळ काम करून घेतले जाते.

'चायना लेबर वॉच'ने केला भांडाफोड...
- चीनची NGO 'चायना लेबर वॉच'ने याप्रकरणाचा भांडाफोन केला आहे. अॅपलसाठी स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या वर्कर्सकडून कमी पगारात प्रचंड मेहनत करून घेतात. इतकेच नव्हेतर त्यांच्या खोट्या पेपर्सवर स्वाक्षरीही घेतात.
- परिणाम वर्कर्स आत्महत्या करत असल्याची बाब समोर आली आहे.

असे झाले इन्व्हेस्टिगेशन....
- NGO ने एका अंडर कव्हर इन्व्हेस्टिगेटरच्या हवाल्याने हा रिपोर्ट तयार केला आहे.
- फॅक्टरीतील वर्कर्सची स्थिती जाणून घेण्यासाठी इन्व्हेस्टिगेटरने Pegatron Group मध्ये काही दिवस नोकरीही केली. त्याला काही दिवसांत कंपनीने कामावरून काढले.
- या रिपोर्टमधून iPhone निर्मात्या वर्कर्सची डेली लाइफ दाखवण्यात आली आहे.
- रिपोर्टनुसार, iPhone बनवणारी कंपनी वर्कर्सकडून कमी पगारात जास्त काम करून घेते. कामाच्या जास्त ताणामुळे वर्कर्स सुसाइड करतात.

काय सांगते आकडेवारी...
iPhone Factory या नावाने ओळखली जाणारी 'फॉक्सकॉन' कंपनीत कामाचा प्रचंड ताण व पगार कमी या समस्येमुळे गेल्या दशकात 17 वर्कर्सने आत्महत्या केली आहे. सर्वाधिक 9 वर्कर्सनी 2010 मध्ये बिल्डिंगवरून उडी घेवून आत्महत्या केली होती. वर्कर्सच्या आत्महत्येच्या सत्रामुळे फॉक्सकॉनने बिल्डिंग परिसरात जाळी लावली होती.

2013 मध्ये फॅक्टरीत 1 मिलियन (10 लाख) वर्कर्स होते. या वर्षात अॅपलने 90 मिलियन iPhoneची निर्मिती केली होती.

'फॉक्सकॉन'मध्ये एकूण कर्मचारी - 1,000,000
> प्रॉडक्शन यूनिट - 100,000
> iPhone 5S हा फोन 2013 मध्ये लॉन्च झाला होता. त्यावर प्रतिदिन 300,000 वर्कर्स काम करत होतेे.
> फॉक्सकॉनचा रनटाइम- 24X7 वर्किंग
> डेली आयफोन प्रॉडक्शन- (सर्व यूनिट्स) - 300000

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून ग्राफिक्समधून जाणून घ्या, अॅपल फॅक्टरी वर्कर्सचे डेली लाइफ...