आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्ष बदलताच स्पाइस जेटला 'अच्छे दिन'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अध्यक्ष बदलण्याचा परिणाम स्पाइस जेटच्या बँक खात्यातदेखील दिसून येत आहे. कंपनीला एप्रिल-जून या तीन महिन्यांत ७१.८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. नवे अध्यक्ष अजय सिंह यांच्या नेतृत्वात एअरलाइनने जानेवारी-मार्च या तीन महिन्यांत २२.१ कोटींचा नफा मिळवला होता. या आधी सलग नऊ महिन्यांपासून स्पाइस जेट नुकसानीत होते. काही महिन्यांतच ती बंद पडणार, असे वाटत होते. मात्र, खर्च कमी करून तसेच जास्त तिकिटे विकून एअरलाइन्स आता नफ्यात आली आहे.

कंपनीचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले की, कंपनीच्या विस्तारीकरणासाठी आता नवीन विमान खरेदी केले जाणार आहेत. सध्या एअरलाइनकडे ३४ विमाने आहेत. यातील १८ बोइंग ७३७, दोन एअरबस ए -३१९ आणि १४ बॉम्बार्डिअर विमान आहेत. यातील कोणत्या प्रकारचे विमान खरेदी करणार याबाबत निर्णय झाला नसला तरी नवीन विमान खरेदी करेपर्यंत काही विमाने भाडेतत्त्वावर घेण्याचा एअरलाइन्सचा विचार अाहे.