आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉयल्टीमुळे अदाणींनी टाळली ऑस्ट्रेलियातील गुंतवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - अदाणी समूहाने ऑस्ट्रेलियातील कार्मिकल काेळसा खाणीत गुंतवणूक करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अनेक दिवसांपासून सतत वादातच अडकलेल्या क्वीन्सलँडमधील या प्रकल्पाची किंमत १४ कोटींच्या घरात आहे.
 
कंपनीच्या प्रवक्त्यांच्या मते, क्वीन्सलँड सरकारला याच महिन्यात रॉयल्टीबाबतचा निर्णय घ्यायचा होता. परंतु, त्यांनी कोणताच निर्णय न घेतल्यामुळे अदाणी समूहाने हा निर्णय घेतला आहे. क्वीन्सलँडच्या मुख्यमंत्री अॅनास्टेसिया पलासजुक यांनी सांगितले की, या मुद्यावर अद्याप कॅबिनेटचा कोणताच निर्णय झालेला नाही. परंतु, आम्हाला आमच्या भागात रोजगाराच्या संधी हव्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प सुरू व्हावा, अशी आमची इच्छा आहे. दरम्यान,  कार्मिकल खाणप्रकल्प सुरुवातीपासूनच वादात अडकलेला आहे.
 
येथील पर्यावरणविषयक संस्थांकडून यास विरोध सुरू आहे. त्यांच्या मते, यामुळे ग्रेट बॅरिअर रिफला नुकसान होईल. या भागात मोठ्या प्रमाणात सागरी जीव राहतात.  कंपनीने राज्य सरकारवर दबाव टाकण्यासाठी गुंतवणूक टाळण्याचा डाव खेळल्याचा आरोप स्थानिक माध्यमांनी केला आहे. कमी रॉयल्टी देता यावी यासाठी कंपनीला गुप्त करार अपेक्षित आहे. सुरुवातीची सात वर्षे अदाणी समूह फक्त २० लाख डॉलरचीच रॉयल्टी देऊ इच्छित होता. त्यामुळे सरकारचे ३२ कोटी डॉलरचे नुकसान होईल, असेही माध्यमांनी म्हटले आहे.    
 
आम्ही कोणतेही अनुदान देणार नाही : सरकार   
क्वीन्सलँड राज्याचे मंत्री मार्क बेली यांनी म्हटले आहे की, रॉयल्टीवर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. पण, कोणताच निर्णय होऊ शकला नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हापासून आमची भूमिका स्पष्ट असून या प्रकल्पास आम्ही कोणतेच अनुदान देणार नाही.
बातम्या आणखी आहेत...