आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिन्यांत भेसळ ४५%, सरकारची लोकसभेत माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ ही तशी नवीन बाब नाही. ज्वेलर्स जितके कॅरेटचे दागिने सांगतात, प्रत्यक्षात ते तितके असत नाहीत, अशी तक्रार छोट्या - मोठ्या पातळीवर सर्वच ज्वेलर्सच्याबाबतीत ग्राहक करतात. परंतु यापेक्षाही हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांमधील दिवसेंदिवस वाढत जाणारी भेसळ ही चिंताजनक बाब आहे. ही भेसळ ४५ टक्क्यांपर्यंत
पोहोचली आहे.

सरकारने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. ग्राहक प्रकरणांचे मंत्री रामविलास पासवान यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, सरकारने सोन्या दागिन्यांबाबत २००१ व २००६ मध्ये दोन सर्वेक्षण केले होते. पहिल्या सर्वेक्षणात सरासरी ८९ टक्के नमुने नापास झाले होते. तर दुस-या सर्वेक्षणात ९० टक्के नमुने चाचणीत भेसळयुक्त ठरले होते. यातून सरासरी भेसळ ११ % नी वाढून १३.५ % झाली आहे. दागिन्यांमधील किमान भेसळ आधी ३८. ६ % होती. आता ती वाढून ४४. ६% झाली आहे.
ग्राहक असोसिएशन ऑफ इंडियाने गेल्या महिन्यात म्हटले होते की देशात विकल्या जाणा-या विना हॉलमार्कच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये ४० टक्क्यांपर्यंत भेसळ असते. जर १३. ५ टक्के सरासरी भेसळ असेल तर त्याआधारे मोजणी केली असता देशात ५० टक्के दागिने विना हॉलमार्कचे विकले जातात. त्यामुळे गेल्यावर्षी ग्राहकांनी १५,३०० कोटी रुपयांचे झाले आहे. २०१४मध्ये देशात ८४२.७ टन सोन्याची विक्री झाली आहे. त्यात भेसळीचे प्रमाण अर्ध्याच्या जवळपास आहे. भारतात सोन्यासोबतच दागिन्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे त्यातील भेसळीचा फटका ग्राहकांना सोसावा लागत आहे.

भेसळीचा अर्थ फसवणूक
सोन्यात १३. ५ टक्क्के अशुद्ध असतील तर त्याचा अर्थ २४ कॅरेटच्या दागिन्यात २०. ७४ कॅरेट सोनेच खरे असते. अशाच प्रकारे २२ कॅरेटच्या सोन्यात १९ किंवा २० कॅरेटचे सोने १७. ३ कॅरेटचेच असते. देशात सध्या देशात ३३१ मान्यताप्राप्त हॉलमार्क केंद्र आहेत. हॉलमार्क प्रमाणीकरण अनिवार्य नव्हे तर ऐच्छिक आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेतेच नव्हे तर मान्यताप्राप्त ज्वेलर्सदेखील विना हॉलमार्कचे दागिने विकतात.