आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी क्षेत्र घटले तरी उत्पादनात वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील कृषी क्षेत्रात घट होत असली तरी कृषी उत्पादनात वाढ होत असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. राज्य सरकारच्या वतीने पिकांमध्ये होत असलेल्या बदलांवर लक्ष ठेवण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी राज्यांना केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने कृषी योग्य जमीन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यांनी देखील कृषी योग्य जमीन अकृषक कामासाठी वापरली जाऊ नये, याकडे लक्ष ठेवण्याची मागणी त्यांनी केली.यंदा देशभरात दुष्काळ असल्यामुळे चालू वर्ष सोडल्यास आतापर्यंत कृषी उत्पादनात वाढच नोंदवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. २००७-०८ ते २०१०-११ दरम्यान कृषी योग्य जमीन १८२२.०९ लाख हेक्टर होती. मात्र, २०१४ मध्ये हा आकडा कमी होवून १८१७ लाख हेक्टरवर आला असल्याची माहिती देखील सिंह यांनी लोकसभेत दिली.
बातम्या आणखी आहेत...