आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकारचा ब्रेकअप प्लॅन, हिश्शांमध्ये होऊ शकते विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्जात अडकलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकार ब्रेकअप प्लॅनवर विचार करत आहे. यानुसार, खरेदीदारांना आकर्षिक करण्यासाठी एअर इंडियाची हिश्शांमध्ये विक्री केली जाऊ शकते. या विमान कंपनीच्या तोट्याचा विचार करून सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
 
पुढच्या महिन्यात सुरू होईल प्रोसेस...
-वृत्तसंस्थेनुसार, या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की एअर इंडियाच्या विक्रीची प्रोसेस पुढच्या वर्षी सुरू होऊ शकते. कारण ही पूर्ण प्रोसेस या वर्षभरात पूर्ण व्हावी अशी नरेंद्र मोदींची अपेक्षा आहे.
-मागच्या महिन्यात मोदींच्या नेतृत्वातील कॅबिनेटने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला मंजुरी दिली होती. मागच्या काही वर्षांत केंद्र सरकारने एअर इंडियामध्ये अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली होती.

टाटा ग्रुप खरेदीच्या शर्यतीत
- अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पाच वरिष्ठ मंत्र्यांची एक कमिटी या महिन्याच्या शेवटी एअर इंडियाच्या विक्रीच्या प्लॅनवर काम सुरू करणार आहे.
- एअर इंडियाच्या खरेदीत टाटा, इंडिगो आणि स्पाइसजेटने रुची दाखवली आहे. या ग्रुप्सनी याची तयारीही सुरू केली आहे. यासाठी रतन टाटा यांनी नुकतीच पंतप्रधान आणि नागरी उड्डयन मंत्री यांची भेट घेतली होती.
बातम्या आणखी आहेत...