आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National Carrier Air India Stops Serving Non Vegetarian Meals For Economy Class On Domestic Routes

इकॉनॉमी क्लासमध्ये नॉनव्हेज बंद, खर्चात कपात करण्यासाठी एअर इंडियाने घेतला निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एअर इंडिया एअरलाइन्स आपल्या फ्लाइट्सच्या इकॉनॉमी क्लासमध्ये मांसाहारी पदार्थ वाढणार नाही. एकूण खर्चात कपात करण्यासाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. ही सर्व्हिस डोमेस्टिक फ्लाइट्ससाठी बंद करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, हा निर्णय मागच्याच महिन्यात घेण्यात आला होता. एअर इंडियावर 50 हजार कोटींचे कर्ज आहे. यामुळे सरकारने याची विक्री करण्याची तयारी चालवली आहे. 
 
बिझनेस क्लासमध्ये नाहीये बंदी
- एअर इंडियाच्या इंटरनॅशनल तसेच डोमेस्टिक मार्गांवरील बिझनेस आणि फर्स्ट क्लास प्रवाशांच्या खाण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. या कॅटेगिरीतील प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही प्रकारचे जेवण सर्व्ह केले जाईल.
- एअर लाइन्सने सोमवारी जारी केलेल्या स्टेटमेंटनुसार, डोमेस्टिक फ्लाइट्सच्या इकॉनॉमी क्लासमध्ये नॉनव्हेज पदार्थ सर्व्ह करण्यामागे अन्नाची नासाडी रोखणे तसेच एकूण खर्च कमी करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. एअरलाइन्सनुसार, यामुळे केटरिंग सर्व्हिसही आणखी चांगली होईल.
 
इंधनातही बचत करण्याची कसरत
-एअर इंडियाने मागच्या महिन्यात सॅलड सर्व्ह न करणे तसेच मॅगझिन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. केबिनचे वजन कमी करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यामागे वजन कमी असेल तर इंधनही कमी लागेल असे मानले जाते.
 
हेही जरूर वाचा
बातम्या आणखी आहेत...