आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमान प्रवास महागणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जेट इंधनाच्या किमतीत ७.५ टक्के आणि विनाअनुदानित एलपीजी घरगुती गॅसच्या किमतीत १०.५० रुपये प्रति सिलिंडर वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याने तेल कंपन्यांनी ही भाववाढ केली आहे. जेट इंधनाच्या किमती वाढल्यामुळे विमान कंपन्या भाडेवाढ करण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप कोणत्याही कंपनीने दरवाढीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

तेल कंपन्यांनी सांगितल्याप्रमाणे, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढत असून एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) चे दर दिल्लीमध्ये ७.५४ टक्के वाढून ५३,३५३.९२ रुपये झाले आहेत. याअाधीदेखील १ मे रोजी एटीएफच्या किमतीत २७२ रुपयांची वाढ झाली होती. तसेच दिल्लीमध्ये विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६१६ रुपयांवरून ६२६.५० रुपये प्रतिसिलिंडर झाली आहे.
विमान कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. एअरलाइन्सच्या एकूण ऑपरेटिंग खर्चात ४० टक्के खर्च हा इंधनाचा असतो. आर्थिक खर्चाचा बोजा ते ग्राहकांवर टाकू शकतात.