आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Banks Replace Damaged Notes Reserve Bank Of India

सर्व बँका फाटक्या नोटा बदलून देणार, रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना कडक निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - आता सर्व बँकांच्या सर्व शाखांना कमी मूल्याच्या (१०, २०, ५० रुपये आदी) सर्व प्रकारच्या नोटा मिळणार आहेत. एवढेच नव्हे, तर येत्या १९ मार्चपासून सर्व बँकांना फाटक्या नोटा स्वीकाराव्या लागणार आहेत. रिझर्व्ह बँकेने या संदर्भात बँकांना कडक शब्दांत निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने यापूर्वीही बँकांना या संदर्भातील निर्देश दिले होते. मात्र, त्याचे
पालन न झाल्याने रिझर्व्ह बँकेने आता कडक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात बँकांनी १८ मार्चपर्यंत सर्व तयारी करावी, असेही निर्देश केंद्रीय बँकेने दिले आहेत. यासाठी काही बँकांनी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या एखाद्या बँकेतच अशी सुविधा मिळते. त्यामुळे फाटक्या नोटा तशाच पडून राहतात.

नकार दिल्यास काय
एखाद्या बँकेने फाटक्या नोटा बदलून देण्यास नकार दिला तर सर्वप्रथम त्या बँक शाखा व्यवस्थापकाकडे लेखी तक्रार करावी व त्याची एक प्रत रिझर्व्ह बँकेकडे पाठवावी.

सुविधा काय मिळणार
>केवळ ठेवींसाठीच नव्हे, तर एखादा ग्राहक फाटकी नोट घेऊन आला तर वैयक्तिक विनंतीवरून बँकेला ती नोट स्वीकारावी लागेल.
>एखादा ग्राहक केवळ फाटक्या नोटा बदलण्यासाठी बँकेत जाऊ शकेल.
>बँकेत खाते असो किंवा नसो, ग्राहकाला बँकेतून फाटकी नोट बदलून मिळणार.
>हा नियम खासगी तसेच सरकारी बँकांना समान स्वरूपात लागू होईल.

...तर लेखी तक्रार करा
रिझर्व्ह बँकेने स्वच्छ नोटा धोरणाअंतर्गत सर्व बँकांना फाटक्या नोटा बदलून देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बँकेच्या प्रत्येक शाखेत नोटा बदलून मिळतील. जी बँक असे करण्यास नकार देईल त्याची लेखी तक्रार रिझर्व्ह बँकेकडे करावी. त्यानुसार कार्यवाही होईल.
मनोजकुमार वर्मा, विभागीय संचालक, भारतीय रिझर्व्ह बँक

सध्याची अडचण
>कोणतीही बँक थोडी फाटलेली नोट ठेवीत स्वीकारत नाही.
>अनेकदा ग्राहक लांबच लांब रांगेत उभे राहिल्यानंतर कॅशियरकडून नकार आल्याने रोख रक्कम जमा करू शकत नाही.