आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबानींच्या अॅंटिलियामध्ये होणार या कोट्यधिशाचे रिसेप्शन, नीता करताहेत तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर/मुंबई- मुकंद ग्रुपचे को-चेअरमन राजेश शहा यांचा मुलगा कौस्तुभ याचे रिसेप्शन मुकेश आणि नीता अंबानी यांच्या अॅंटिलियात होणार आहे. या हायप्रोफाईल कार्यक्रमाची तयारी दस्तुरखुद्द नीता अंबानी करत असल्याचे सांगितले जात आहे. राधा भारमभट्ट नावाच्या मॉडेलसोबत कौस्तुभचे लग्न होणार आहे. लग्नाचा कार्यक्रम उदयपुरला होणार असून रिसेप्शन मुंबईला आयोजित केले आहे.
वाचा कोण आहे राधा भारमभट्ट
- राधा युकेचे रहिवासी आहे. मिस इंडिया ब्रिटनचे टायटल तिने जिंकले आहे.
- प्रो कबड्डी टीम 'पटना पायरेट्स'चा कौस्तुभ मालक आहे. शहा यांची पत्नी बांसरी या उदयपुरमध्ये लग्नाची तयारी करत आहेत.
- या लग्नाला नीरज बजाज, आनंद महिंद्रा, सज्जन जिंदल यांसारखे प्रतिष्ठित उद्योगपती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
- शहा आणि अंबानी कुटुंबीय अत्यंत निकट आहेत. त्यामुळेच अंबानी कुटुंबीय गुजरातील थीमवर अॅंटिलिया डेकोरेट करत आहेत.
- या रिसेप्शनला देशभरातून निवडक उद्योगपती, नेते मंडळी आणि सेलेब्ज येणार आहेत.

अॅंटिलियामध्ये यापूर्वीही झाली आहे पार्टी
- अंबानी कुटुबीयांनी यापूर्वीही अॅंटिलियामध्ये पार्टी ऑर्गनाईज केली आहे.
- क्रिकेटर हरभजनसिंग, रोहित शर्मा यांच्या लग्नाच्या पार्ट्या अॅंटिलियामध्ये झाल्या होत्या.
- हे दोघेही अंबानी यांच्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचे खेळाडू आहेत. या पार्टीला बॉलिवूड, क्रीडा, कार्पोरेट जगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
- सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या शतकाच्या वेळीही झाली होती भव्य पार्टी.
पुढील स्लाईडवर बघा...कौस्तुभ आणि राधा भारमभट्ट यांचे काही ग्लॅमरस फोटो.... असे आहे अॅंटिलिया...
बातम्या आणखी आहेत...