आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल अंबानी लाखही परत करण्यात अपयशी, असा सुरु आहे बॅंकांकडून छळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ४५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांच्या कर्जात बुडालेले उद्योगपती अनिल अंबानी यांची संकटे दिवसेंदिवस वाढत आहेत. आतापर्यंत अनेक बॅकांचे कोट्यवधी रुपये परत करण्यात ते अपयशी ठरले आहेत. एवढेच नव्हे तर लाख रुपयेही परत करणे त्यांना जिकरीचे जात आहे. अशाच एका प्रकरणी एक कंपनी त्यांच्या मागे हात धुवून लागली आहे. अनिल अंबानी यांची प्रमुख कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) हिला दिवाळखोर घोषित करण्यासाठी या कंपनीने अर्ज दाखल केला आहे.

 

या कंपनीचे आहे ४५ लाख रुपये कर्ज
पीआर कंपनी फॉर्च्युना पब्लिक रिलेशन्स (पीआर) याच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. या कंपनीचे ४५ लाख रुपये आरकॉमने परत दिलेले नाहीत. त्यामुळे आरकॉमला दिवाळखोर कंपनी घोषित करावे अशी मागणी या कंपनीने केली आहे. आरकॉमला दिवाळखोर घोषित करुन आमची रक्कम परत करावी, असा तगादा या कंपनीने लावला आहे.

 

फॉर्च्युुनाने याबाबत एनसीएलटीच्या मुंबई ब्रांचसमोर आपली डिमांड ठेवत सांगितले, की आरकॉमने आमचे ४५ लाख रुपये दिलेले नाहीत. एनसीएलटी या प्रकरणी १९ डिसेंबरला सुनावणी करणार आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा, या कंपन्यांनीही आरकॉमला दिवळखोर घोषित करण्याची मागणी केली आहे....

बातम्या आणखी आहेत...