आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अार्क राेबाेट’ तयार करणाऱ्या राजेशला २ काेटींचे बक्षीस, मेक इन इंडियात दखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नव्या संकल्पनांना प्रत्यक्षात अाणणाऱ्या तरुणांना प्राेत्साहन देण्यासाठी मेक इन इंडिया सप्ताहामध्ये अालेल्या एका खास स्पर्धेत गाेदाम व्यवस्थापनासाठी एक अागळेवेगळे ‘अार्क राेबाेट’ साॅफ्टवेअर तयार करणारा बंगळुरू येथील राजेश मनपट हा तरुण उद्योजक क्यू प्राइझ - मेक इन इंडियाचा विजेता ठरला. त्याला दाेन काेटी रुपयांचे बक्षीस देण्यात अाले अाहे.
मेक इन इंडिया सप्ताहाच्या समाराेपानिमित्त क्यू प्राइझ - मेक इन इंडिया स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राजेशसह आनंद मदन गोपाल यांनी ‘कार्डिक डिझाइन’, अमरदीप सिंग यांनी ‘नेक्स्ट गिअर टेक्नॉलॉजी’, तनुज भोजवानी यांनी ‘टेराफ्लाइट डेटा लॅब्ज’, अनुराग राणा यांनी ‘थिराई इंटरअॅक्टिव्ह’ याबाबत सादरीकरण केले.
राजेशने नवकल्पनांच्या आधारे बनविण्यात आलेल्या सॉफ्टवेअरबाबत उपस्थितांसमोर सहा मिनिटांत सादरीकरण केले. यानंतर परीक्षकांनी या पाच जणांना त्यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरबाबत तसेच या सॉफ्टवेअरच्या अंमलबजावणीसाठी होणारा खर्च याबाबत प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांच्या उत्तरात राजेश सरस ठरला अाणि त्याने बक्षीस पटकावले. गाेदामातील मालाची साठवणूक किंवा ताे माल काढणे ही दाेन्ही कामे जिकिरीचे असते. विशेष करून नाशवंत माल गाेदामातून वेळेवर काढणे गरजेचे असते. अशा प्रकारचा माल गाेदामातून झटपट व सक्षमतेने काढता यावा यासाठी गाेदामे स्वयंंचलित असणे गरजेचे ठरते. त्यातून ही बऱ्याचदा मनुष्यबळाच्या अनुपलब्धतेमुळे या कामाला विलंब हाेताे तसेच चुकीच्या हाताळणीमुळे दर्जाचाही प्रश्न निर्माण हाेताे. मालाची अाॅर्डर वाढल्यानंतर ही अडचण जास्त हाेते. व्यवसाय वाढत असलेल्या कंपन्यांना हा त्रास जास्त हाेताे. अशा वेळी ‘अार्क राेबाेट’चा वापर करून डेटा अॅनालिटिक्सच्या माध्यमातून मालाची हाताळणी करणे सुलभ हाेणार अाहे. तसेच जास्त विकला जाणारा माल जवळच ठेवता येणे शक्य अाहे. स्वयंचलित तयार केलेला गाेदाम उद्याेगाचा कणा समजला जाताे. या साॅफ्टवेअरमुळे वाजवी खर्चात गाेदामांचे व्यवस्थापन हाेऊ शकते. ई-रिटेल अाणि रिटेल व्यावसायिकांना याचा लाभ हाेईल.

फायदा कसा हाेणार?
*गाेदामात काेणती उत्पादने उपलब्ध अाहेत, याची माहिती त्वरित उपलब्ध.
*उत्पादनातील दाेष त्वरित माहिती हाेऊन चांगले उत्पादन उचलणे शक्य.
*उत्पादनांची याेग्य अाणि सुरक्षित हाताळणी.
*गाेदामातील कप्प्यांमध्ये सहज, सुलभ मालभरणी
*न विकल्या जाणाऱ्या मालाची त्वरित माहिती मिळून ते गाेदामाबाहेर काढणे शक्य.
*‘एक्स्पायरी’ तारीख जवळ अालेले अाणि खराब झालेल्या उत्पादनांची माहिती त्वरित मिळणार.
*कमी मनुष्यबळाची अावश्यकता अाणि हाताळणी, मालभरणीचा खर्च कमी.