लघु उद्योजकांना मदत करणे व त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी असा मोदी सरकारचा मानस आहे. हा मानस सरकारने प्रत्यक्षात आणण्यासाठी २०१५ च्या अर्थ संकल्पात वरील संस्थेच्या निर्मितीची घोषणा केली. भारत ग्रामोंमे बसा हे अशी महात्मा गांधींची उक्ती होती. मागील सरकारने या उक्तीप्रमाणे कोणतीही फारशी कृती तर केली नाहीच पण औद्योगिक व कृषी क्षेत्राला प्रगतीपासून दूर ठेवले. हे दोन्हींच्या ग्रोथ रेट वरून स्पष्ट दिसते.
मुद्रा बँक
वास्तविक मुद्रा म्हणजे हे एका इंग्रजी एब्रीव्हेशनचे नाव आहे.(मायक्रो युनिटस डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी) असे याचे नाव असून, एम.यू.डी.आर.ए. हे त्याचे एब्रीव्हेशन आहे. ही बँक नाही, अर्थ पुरवठा करणारी संस्था असून याला कंपनीचे स्वरूप देण्यात आले आहे. भविष्यात हीला बँकेचे स्वरूप येईल म्हणून मुद्रा बँक नावाने ओळखले जाते.
२०००० कोटींचे भांडवल, ३००० कोटींची क्रेडिट गॅरंटी
मुद्रा या संस्थेजवळ २०००० कोटी रुपयांचे सुरुवातीला भांडवल असेल व ३००० कोटींची क्रेडिट गॅरंटी या संस्थेला मिळेल. असा हा अर्थ पुरवठा मुद्राला विविध बँकांकडून होईल. या नॉन बँकिंग संस्थेला प्रथम व कंपनीचे स्वरूप राहील भविष्यात लोकसभेची मंजुरी घेऊन या अर्थपुरवठा संस्थेला बँकेचा दर्जा दिला जाईल.
व्याज दर कमी दराचा असेल
मुद्रा ही संस्था मुख्यत: लघुउद्योगांनाच अर्थ पुरवठा करेल याचा व्याजाचा दरही अद्याप ठरलेला नसला तरीही तो अगदी कमी दराचा असा असेल.
मुद्राच्या कर्जाचे स्वररूपही तीन प्रकारचे राहील
ज्यामुळे संबंधितांची गरज पाहूनच त्याला योग्य तो अर्थ पुरवठा केला जाईल. या उद्योगांमध्ये शिवणकाम, भरतकाम तसेच छोटे मेकँनिक, छोटे हाँटेल्स, न्हावी, ब्युटी पार्लर चालविणारे, मत्स्योद्योग करणारे तसेच लहान स्वरुपात फेरविक्री करणारे दुकानदारही यामध्ये येतील.
१) शिशु उद्योग नावाच्या प्रकाराला नावाप्रमाणेच रु. ५०,००० पर्यंतचा अर्थ पुरवठा मुद्रातर्फे केला जाईल.
२) किशोर उद्योगाला रु. ५०,००० ते रु. ५ लाख रुपयांप्रमाणे त्याचा एकंदर व्यवहार पाहून अर्थसाहाय्य दिले जाईल.
३) तरुण उद्योग हा उद्योगसुद्धा विशिष्ट प्रकारचा उद्योग करणारा असावा व अशा उद्योगाला ५ लाख ते १० लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा मुद्राचे माध्यमाने केल्या जाईल.
मुद्राचे स्वरूप विशेषकरून
लघु उद्योजकांचीच बँक असे राहील
मुद्रा ही संस्था केंद्र सरकारची असून, राज्य सरकारच्या ज्या अर्थ पुरवठा करणार्या संस्था आहेत. त्याच्याशी संपर्क ठेवून संपूर्ण देशभर या संस्थेची उपयोगीता वाढेल असा प्रयत्न केल्या जाईल. एन. एच. बी. (नॅशनल हाउसिंग बँक) जसे कार्य करीत आहे की ज्यामुळे घर बांधणीला फार मोठ्या प्रमाणावर बढावा मिळत असून, एक विशेष अर्थ पुरवठा संस्था म्हणून ती नावारूपाला आली आहे. तसेच मुद्राचेही स्वरूप विशेषकरून लघु उद्योजकांचीच बँक असे राहील.
युनिव्हर्सल बँकेसारखे होणार स्वरूप
३० कोटी भूमिहीनांना रोजगार मिळून निर्माण होणार एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर : याशिवाय नजीकच्या भविष्यात जागतिक बँक (युनिव्हर्सल बँक) असेही तीला स्वरूप येईल. असा प्रयत्न केला जाईल. असेही संबंधितांनी घोषित केले आहे. जमीन सुधारणा विधेयक मंजूर होऊन तीन कायद्याचे स्वरूप लवकरच येईल. परिणामत: ३० कोटी भूमिहीनाना रोजगार मिळेल असेही अर्थमंत्री जेटली यांनी म्हटले आहे. यामुळे एक इंडस्ट्रीयल कॉरीडॉर निर्माण होईल व भूमिहीनाना नियमित रोजगाराची व्यवस्था होईल. (क्रमश:)