आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या सरकारपेक्षा इंद्राची आमच्यावर कृपा कमीच, अरुण जेटलींना आठवला देव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मागील सरकारच्या तुलनेत इंद्रदेवाची आमच्यावरील कृपा कमी आहे. कृषी क्षेत्रातील हालचाली अर्थव्यवस्थेवर परिणाम करत आहेत. असे असले तरी चांगल्या प्रकारे काम करण्यास सरकार वचनबद्ध असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. हाँगकाँग येथे आयोजित आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी अर्थमंत्री जेटली यांनी विकासाच्या बाबतीत विरोधात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या परिस्थितींचा उल्लेख केला. देशाची ५५ टक्के लोकसंख्या कृषीवर आधारित आहे. गेल्या सरकारच्या काळात झालेल्या पावसाच्या तुलनेत या दोन वर्षांत कमी पाऊस झाला आहे. यामुळे गेल्या आणि या आर्थिक वर्षातील कृषी क्षेत्रात कोणताही बदल झालेला नसल्याचे जेटली यांनी सांगितले.

जेटली असे का म्हणाले ?
-मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा १५ टक्के कमी पडण्याची शक्यता.
-मान्सूनचा सुरुवातीला १२ टक्के कमी पडण्याचा अंदाज होता.

-गेल्या वर्षीदेखील सामान्यपेक्षा १२ टक्के कमी पाऊस झाला.

पावसाने महागाई वाढण्याची शक्यता
-गेल्या वर्षी कमी पावसामुळे खरिपाचे नुकसान झाले होते.
-अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे गहू व रब्बीची पिके खराब झाली होती
-या वेळीही खरिपाच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून महागाई वाढू शकते.

गुंतवणूक करणे महाग
जेटली यांनी आर्थिक प्रगतीसाठी विदेशी गुंतवणूक वाढण्यावर जोर दिला. जास्त पैसा गुंतवावा लागत असल्याने अनेक क्षेत्रांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये मंदी असल्याचे ते म्हणाले. विदेशी गुंतवणुकीने त्यात तेजी आणता येईल.

विकासदर ७.३ टक्के
गेल्या वर्षी ७.३ टक्के विकासदर मिळवण्यात यश आले होते. सुधारणांच्या दिशेने आम्ही सलग पुढे जात आहोत. तसेच देशाचा राजकोशीय घाटा व महागाई कमी होत आहे. अशा सर्व परिस्थितीमुळे गेल्या वर्षीपेक्षा चांगला विकास दर राहण्याची आशा जेटली यांनी व्यक्त केली.