आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या भागीदारीने आपली सिलिकॉन व्हॅली बनवण्याची चीनची इच्छा : पनगढिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीला टक्कर देता येईल असे तंत्रज्ञान पार्क बनवण्याची चीनची इच्छा असून त्यासाठी भारताची मदत घेण्यात येणार आहे. हुन्नान प्रदेशात चीन-भारत तंत्रज्ञान पार्क नावाने बनवणाऱ्या या आयटी पार्कमध्ये चीन मोठ्या प्रमाणावर भारतीय आयटी तज्ज्ञांना रोजगार देईल. पहिल्या टप्प्यात सुमारे २,००० भारतीय तज्ज्ञांना रोजगार देण्याचा प्रस्ताव आहे. पुढील टप्प्यात रोजगाराची संख्या वाढून १०,००० पर्यंत वाढवण्यात येईल.
चीनसोबत मिळून अनेक कार्यकारी समित्या बनवण्यात आल्या असल्याचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी सांगितले. यातील एक समिती तंत्रज्ञानाची आहे. या समितीसमोर हुन्नान प्रदेशात तंत्रज्ञान पार्क बनवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. एकीकडे सॉफ्टवेअर क्षेत्राच्या विकासात दक्षतेसाठी चीनला आपले सहकार्य हवे असून दुसरीकडे हार्डवेअरमध्ये असलेल्या चीनच्या दक्षतेला भारतात आणण्याची त्यांनी इच्छा आहे. त्याचबरोबर चीन “इंटरनेट ऑफ थिंग्स’ (आयआेटी) मध्ये देखील भूमिका बजावण्यास तयार आहे. हे तंत्रज्ञान मशीनने मशीनला जोडण्यासाठी उपयोगी ठरते. आयओटीमुळे आपल्या मोबाइलवरून घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर कंट्रोल करणे शक्य होईल. याला ते “इंटरनेट प्लस’ असे म्हणतात. “डिजिटल इंडिया’ उपक्रमातदेखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास चीन तयार आहे.
चीनलाहवे उदार व्हिसा धोरण
चीननेआपल्या नागरिकांसाठी उदार व्हिसा धोरण, तत्काळ व्हिसा प्रोसेसिंगची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी आम्ही विदेश मंत्रालयापर्यंत पोहोचवणार असल्याचे नीती आयोगातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
 भारतासोबत समुद्रकिनाऱ्यावरील राज्यांत औद्योगिक प्रकल्प उभे करण्यात
 स्मार्ट सिटीमध्ये सिव्हेज, स्मार्ट लायटिंग, ठोस कचऱ्याचा निपटारा करण्यात
 ऊर्जा क्षेत्रात कोळशापासून गॅस बनवण्यासह सौरऊर्जा क्षेत्रात
 भारतात हाय स्पीड रेल्वेसह मेट्रो रेल्वेमध्ये गुंतवणूक करण्यात इच्छुक
अरविंद पनगढ़िया
उपाध्यक्ष,नीति आयोग
भारतात या क्षेत्रात गुंतवणुकीची इच्छा
चीनच्या आग्रहाचे कारण
हुन्नान प्रदेशात तयार होत असलेल्या तंत्रज्ञान पार्कमध्ये १०,००० अायटी तज्ज्ञांना मिळेल रोजगार
 चीनच्या उत्पादनावर शंका घेतल्या जातात. भारत सोबत आल्यास मोठ्या प्रमाणावर शंका कमी होतील.
 चीनला भारतासोबतची स्पर्धा वाढवण्याची इच्छा आहे या शंकेलादेखील “पीपल-टू-पीपल’ काँटॅक्ट वाढवून कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

चीन पाकिस्तानची मदत करत असताना संबंध वाढवणे योग्य आहे का?
पनगढियायांनी सांगितले की, नीती आयोगाचा उद्देश वेगळा आहे. हा प्रश्न राजकीय पातळीवर विचारला गेला पाहिजे. सरकारने नीती आयोगाकडे चीनसोबत विविध आर्थिक क्षेत्रात संबंध वाढवणे, चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे. आयोग त्याच दृष्टीने काम करत आहे. कोणत्याही देशासोबत द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा करताना विशेष लक्षानेच नीती आयोग चर्चा करेल. चीनसोबत आम्ही पाच समित्यांसह काम करत आहोत. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, ऊर्जा, शहरी विकासाचा समावेश आहे. त्यांच्याकडून सुरुवात खूपच चांगली झाली आहे. यामुळे व्यापारात दोन्ही देशांना फायदा होईल. या क्षेत्रात गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...