आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती, ह्युंदाईच्या विक्रीत वाढ, महिंद्रा, टाटाची विक्री घसरली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सहा महिन्यांपासून घसरणीच्या घाटात अडकलेल्या कार विक्रीच्या गाडीला मार्चमध्येही फारसा दिलासा मिळाला नाही. मारुती सुझुकी, ह्युंदाई या आघाडीच्या कंपन्या वगळता महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, फोर्ड या कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे.
कार व वाहन विक्रीची आकडेवारी कंपन्यांनी बुधवारी जाहीर केली.
होंडा कार्स इंडियाच्या विक्रीत मार्चमध्ये २३ टक्के वाढ झाली आहे. अमेझ व सिटी या सेडान मॉडेलच्या जोरावर होंडाने ही वाढ नोंदवली. मारुती-सुझुकीने त्यांच्या देशातील कार विक्रीत १.४ टक्के वाढ झाली असल्याचे सांगितले. कंपनीने मार्चमध्ये मिनी सेगमेंटमधील अल्टो आणि वॅगन आरची विक्री गतवर्षीच्या मार्चमधील ४०,०८५ च्या तुलनेत ४०,१५९ वर पोहोचली, तर कॉम्पॅक्ट सेगमेंटमधील स्विफ्ट, डिझायर, इस्टिलो, रिट्झ यांच्या विक्रीत १२.५ टक्क्यांनी घट आली. कंपनीने या आर्थिक वर्षात १२,९२,४१५ कारच्या विक्रीसह विक्रम नोंदवला.

ह्युंदाई मोटार इंडियाच्या विक्रीत मार्चमध्ये १२.९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले, वाहन उद्योगातील अर्थचक्र मंदावले आहे. २०१५ मध्ये विक्रीच्या आघाडीवर फार आशादायी चित्र नाही.
महिंद्रा अँड महिंद्राची देशातील विक्री १५ टक्क्यांनी घसरली आहे. कंपनीने मार्च २०१४ मध्ये ४८,४९० वाहनांची विक्री केली होती. यंदाच्या मार्चमध्ये ४१,१९३ वाहनांची विक्री झाली.
फोर्ड इंडियाच्या विक्रीत १७.३५ टक्के घट झाली. जनरल मोटर्सच्या िवक्रीत मार्चमध्ये ३५.५ टक्के घसरण दिसून आली.

दुचाकी विक्रीत दिलासा

मोटारसायकल विक्रीत मार्चमध्ये किंचित वाढ झाली. हीरो मोटोकॉर्पने ५,३१,७५० मोटारसायकलींच्या विक्रीसह १.४७ टक्के वाढ नोंदवली. होंडा मोटारसायकलने ३,९९,१७८ दुचाकी विक्रीसह १.८१ टक्के वाढ साधली. टीव्हीएस मोटारने मार्चमध्ये २,००,२३८ मोटारसायकलींची विक्री केली, कंपनीने सहा टक्के वाढीची नोंद केली.
नव्या मॉडेल्सवर मदार

^सध्या वाहन उद्योगासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यात नवी मॉडेल्स महत्त्वाची ठरणार आहेत. आता मारुती ग्रामीण तसेच शहरी भागातील विस्तारावर लक्ष केंद्रित करणार आहे.
आर. एस. कल्सी, कार्यकारी संचालक (विक्री), मारुती-सुझुकी.