आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Automobile Part's Business To Increase In Coming Months

वाहनांच्या सुट्या भागांच्या व्यवसायात वाढ, "एक्मा'ने व्यक्त केला विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या आर्थिक वर्षात २०१४-१५मध्ये देशातील वाहनाच्या सुट्या भागांचा (ऑटो कम्पोनंट) व्यवसाय ११.१ टक्क्यांनी तर याची निर्यात ११.४ टक्क्यांनी वाढली आहे. तर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतदेखील वाढ झाली असून या क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात ८ ते १० टक्क्यांची वाढ होण्याची आशा आहे. ऑटो कम्पोनंट क्षेत्रातील एकूण आर्थिक उलाढालीत व्यावसायिक वाहनांची भागीदारी जवळपास २० टक्के आहे.

वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांची संस्था ऑटोमोटिव्ह कम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अाॅफ इंडिया (एक्मा) च्या वतीने मंगळवारी वार्षिक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ऑटो कम्पोनंट सेक्टरच्या व्यवसायात वृद्धी होऊन २.३४ लाख कोटी रुपयांपर्यंत पाेहोचला असल्याचे एक्माचे अध्यक्ष रमेश सुरी यांनी सांगितले. या आधीच्या वर्षात २०१३-१४ मध्ये तो २.११ लाख कोटी रुपये होता. यात २०२० पर्यंत वृद्धी होऊन ६.३८ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याच प्रमाणे या क्षेत्रातील निर्यातदेखील गेल्या वर्षी वाढून ६८,५०० कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. या आधीच्या वर्षात तो ६१,४०० करोड रुपये होता.
नव्या सरकारमुळे गती
आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये वाहनांच्या सुट्या भागांचा व्यवसाय करणाऱ्या उद्योगांसमोर अनेक संकटे उभी होती. मात्र, नव्या सरकारने अवलंबलेली नीती आणि अनेक दिवसांपासून अडकलेल्या प्रकल्पांमध्ये गती आल्याने या क्षेत्रातदेखील वाढ झाली असल्याचे रमेश सुरी यांनी सांगितले.

गुंतवणूक घटण्याची चिंता
ऑटो कम्पोनंट क्षेत्रात गुंतवणुकीत होत असलेली घट हा चिंतेचा विषय ठरत आहे. संपलेल्या आर्थिक वर्षात या क्षेत्रात २,००० ते २,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. याच्या आधीच्या वर्षात ती ३,२०० ते ४,४०० कोटी रुपये झाली होती.

७.५ टक्के आयात वाढली
गेल्या आर्थिक वर्षात सुट्या भागांच्या आयातीत ७.५ टक्के वाढ झाली असून ती ८२,९०० कोटी रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे. या आधीच्या आर्थिक वर्षांत २०१३ -१४ मध्ये ही ७७,१०० कोटी रुपये होती. या मागे विदेशी वाहन निर्माण करणाऱ्या कंपनीच्या वतीने देशांतर्गत उत्पादन सुरू न होणे आणि टेक्नॉलॉजीवर आधारित उपकरणे देशात उपलब्ध नसणे हे प्रमुख कारण आहे.
उद्योगासमोरील आव्हाने
- वाहनांच्या विक्रीमध्ये मंदी
- निधीची जास्त गुंतवणूक
- कर्जाला जास्त व्याजदर
- गुंतवणुकीची मंद गती