आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेव बाबांचा नवा \'पराक्रम\', एफएमसीजी उद्योगातील यशानंतर आता सिक्युरिटीमध्येही पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एफएमसीजी उद्योगात पतंजलीने वार्षिक 100 टक्के दराने वाढ कायम ठेवली आहे. - Divya Marathi
एफएमसीजी उद्योगात पतंजलीने वार्षिक 100 टक्के दराने वाढ कायम ठेवली आहे.
नवी दिल्ली - एफएमसीजी बिझनेसमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर रामदेव बाबा आता प्रायव्हेट सिक्युरिटी बिझनेसमध्ये उतरले आहेत. गुरुवारी त्यांनी हरिद्वार येथील पतंजली योगपीठात पराक्रम सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेड या नावाने सिक्युरिटी कंपनीची सुरुवात केली.
पराक्रम सिक्युरिटी सैन्यदल आणि पोलिसांतून निवृत्त सैनिक आणि अधिकाऱ्यांना नोकरीसाठी हायर करेल. 
 
उद्योगात वार्षिक तब्बल 100 टक्क्यांची वाढ...
-रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेदची एफएमसीजी सेक्टरमध्ये दरवर्षी तब्बल 100 टक्के दराने वाढ होत आहे. यामुळे पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण 25 हजार 600 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशाचे 25 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
 
पराक्रम सुरक्षा, आपकी रक्षा...
- रामदेव बाबा यांनी पराक्रम सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेडला 'पराक्रम सुरक्षा, आपकी रक्षा' या ब्रीदवाक्यासह लाँच केले आहे.
- पतंजली आयुर्वेदचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांनी म्हटल्यानुसार, पतंजलीचा संकल्प पूर्ण राष्ट्राची सेवा करण्याचा आहे.
 
जीन्स बिझनेसमध्ये उतरण्याची केली आहे घोषणा
- याआधी रामदेव बाबा यांनी रेडिमेड गारमेंटच्या बिझनेसमध्ये येण्याची घोषणा केलेली आहे.
- पतंजली नावानेच जीन्स बाजारात लाँच करण्याची घोषणा रामदेव बाबा यांनी केली होती.
- तथापि, बाबांनी स्वदेशी अभियान सुरू केले आहे. स्वदेशी उत्पादनांना पाया बनवूनच ते आपल्या उद्योगाला वाढवत आहेत.
 
20 हजार कोटींची उलाढाल
- काही दिवसांपूर्वीच पतंजलीने आपल्या वार्षिक निकालाची घोषणा केली होती. यानुसार, पतंजलीची एकूण उलाढाल 20 हजार कोटी रुपयांहून जास्त झाली आहे. तथापि, एका वर्षापूर्वी ही उलाढाल फक्त 10 हजार कोटींचीच होती. एवढेच नाही, याच्या एका वर्षाआधीही पतंजलीची एकूण उलाढाल फक्त 5 हजार कोटी होती. यावरून पतंजलीचा बिझनेस प्रत्येक वर्षी 100 टक्के दराने वाढत आहे हे दिसून येते.
 
भारतात 40 हजार कोटींची सिक्युरिटी इंडस्ट्री
- एका रिपोर्टनुसार, 2006 मध्ये भारतात प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड सर्व्हिसेस इंडस्ट्री तब्बल 22 हजार कोटी रुपयांची होती, जी 2015 मध्ये 100 टक्के वाढीसह 40 हजार कोटी रुपयांची झाली आहे.
- सध्या देशात तब्बल 1500 सुरक्षा पुरवणाऱ्या कंपन्या आहेत. यांच्याजवळील सिक्युरिटी गार्डसची संख्या 50 लाखांच्या घरात आहे.
बातम्या आणखी आहेत...