आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंपन्यांची वाईट स्थिती, बँकांना धोका : एसअँडपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील कंपन्यांची आर्थिक स्थिती सध्या खराब झाल्यामुळे अलीकडच्या काळात बँकांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचा दावा क्रेडिट गुणांकन संस्था स्टँडर्ड अँड पूअर्स (एसअँडपी) ने केला आहे. मोठ्या नोटा बंद करण्यात आल्यामुळे बँकांच्या वतीने देण्यात आलेल्या कमी कालावधीच्या कर्जावर परिणाम होण्याचीही शक्यता असल्याचे मत एसअँडपीने व्यक्त केली आहे.
भारतातील बँकिंग उद्योग आणि त्यासमोरील धोके याविषयी एसअँडपीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या अहवालात नोटाबंदीचा दीर्घकालीन परिणाम सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. मात्र, अलीकडच्या काळात आर्थिक विकासावर त्याचा विपरीत परिणाम होऊन बँकांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे. ‘बँकिंग इंडस्ट्री कंट्री रिस्क असेसमेंट : इंडिया’ या नावाने हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यानुसार नोटाबंदीच्या निर्णयामुळे सध्या बँकांमधील जमा रक्कम वाढणार असली तरी येत्या काळात सर्व बचतीचा पैसा बँकांमध्ये जमा होणार नाही. भारतीय कंपन्यांसमोर वाढलेल्या समस्यांमध्ये भारतातील आर्थिक संस्थांसमोरील आर्थिक धोका वाढला असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले.
जीडीपीवर नकारात्मक परिणाम - मूडीज : नोटाबंदीमुळे बँकांना फायदा होणार असला तरी अलीकडच्या काळात अर्थव्यवस्थेमधील अनिश्चितता वाढण्याची शक्यता असल्याचे मत गुणांकन संस्था मूडीजने व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...