आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-काँग्रेसने एकत्र यावे: बजाज, ‘जीएसटी’मंजूर करण्याची माणगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - देशाचा विकास आणि हित लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला सारून एकत्र यावे. काँग्रेसचे सरकार असताना भाजपने ‘जीएसटी’ विधेयकाला विरोध केला, तर आता भाजपचे सरकार असताना काँग्रेस जीएसटीला विरोध करत आहे. देशाच्या विकासासाठी जीएसटी विधेयक अतिशय महत्त्वपूर्ण असून हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपने विरोधक असलेल्या काँग्रेससोबत चर्चा करावी आणि काँग्रेसनेही विरोधी भूमिका सोडून देशहितासाठी जीएसटी मंजूर करावा, असा हितोपदेश ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांनी दिला आहे.

एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यूपीए सरकारने आपल्या कार्यकाळात बरीच चांगली कामे केली; परंतु कोळसा घोटाळा, टू-जी घोटाळा प्रकरणांमुळे यूपीए सरकारची देशात प्रचंड बदनामी झाली. त्यामुळे जनतेने भाजपच्या हाती सत्ता दिली. गेल्या सोळा महिन्यांतील या सरकारची कामगिरी यूपीए सरकारच्या तुलनेत चांगली असल्याची पावतीही बजाज यांनी मोदी सरकारला दिली. मोदी सरकारचा ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा प्रयोगही यापूर्वी झाला आहे, परंतु त्यात उद्योजकांना यश आले नाही. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’च्या यशस्वितेबद्दल आपण साशंक असल्याचेही ते म्हणाले.