आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनपीएमुळे विश्वासार्हता धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील उद्योग स्वत:चीच लढाई लढत असून बँकांच्या अडकलेल्या कर्जाबाबत उद्योगांनी सरकारात्मक आणि नैतिक धोरण अवलंबण्याची आवश्यकता असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. बँकांचे कर्ज मुद्दाम डुबवण्याचे अनेक प्रकरणे समोर येत असताना त्यांनी यावर सडकावून टीका केली आहे. अशाच एका प्रकरणात व्यावसायिक विजय मल्ल्या देशाच्या बाहेर गेल्यामुळे बँकांच्या अडकलेल्या कर्जाबाबत (एनपीए) राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे.

उद्योग जगताने स्वत:ची विश्वसनीयता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी उद्योग संघटन सीआयआयच्या वार्षिक अधिवेशनात अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. उद्योग क्षेत्रातील प्रमुख उद्योजकांनी नेहमीच सकारात्मक आणि
धोरणात्मक असायला हवे, त्यांच्यापासून इतरही उद्योजक प्रेरणा घेत असतात. एनपीए कमी करण्यासाठी त्यांनीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे जेटली यांनी सांगितले. विशेष म्हणजे मल्ल्यावर ९००० कोटी रुपयांचे कर्ज असून चौकशी आणि कर्ज वसूल करणाऱ्या बँकांची कारवाई टाळण्यासाठी ते ब्रिटनमध्ये गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सराफा व्यापाऱ्यांवरून "आप'वर टीका : एकीकडे अरविंद केजरीवाल सराफा व्यापाऱ्यांचे समर्थन करत आहेत, तर दुसरीकडे दिल्लीमध्ये दिल्ली सरकार "स्किम्ड मिल्क'सारख्या अत्यावश्यक उत्पादनावर कर लावत असल्याचा आरोप जेटली यांनी केला.

व्याजदर कपाती बाजाराला अपेक्षा
देशातील महागाई दर नियंत्रणात आहे. जास्त व्याजदर अर्थव्यवस्थेतील गतीला बाधक असून व्याजदरात कपात करणे आवश्यक असल्याची अपेक्षा जेटली यांनी व्यक्त केली. भारतीय रिझर्व्ह बँकेची मंगळवारी (५ एप्रिल) पतधोरण आढावा बैठक होणार आहे. त्याच्या एक दिवस आधीच जेटली यांनी व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षेचे महत्त्व वाढले आहे.