आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बन्सल पहिल्यांदाच "फोर्ब्ज'च्या यादीत, अंबानी अग्रस्थानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी फोर्ब्जच्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत स्थान मिळवले आहे. दोघांची एकूण वैयक्तिक मालमत्ता प्रत्येकी ८,५८० कोटी रुपये आहे. या यादीत एकूण १०० नावे आहेत. त्यात सचिन आणि बिन्नी ८६ व्या क्रमांकावर आहेत. कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीच्या संस्थापकाचे नाव पहिल्यांदाच या यादीत आले आहे. सर्व १०० श्रीमंतांच्या मालमत्तांची एकूण किंमत २२,७७,००० कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही ६,६०० कोटींनी कमी आहे.

मुकेश अंबानी यांची मालमत्ता ३१,०२० कोटी रुपयांनी कमी होऊन १,२४,७४० कोटी रुपये राहिली असली तरी या यादीत ते सलग नवव्या महिन्यात अग्रस्थानी आहेत. कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. सन फार्माचे दिलीप संघवी आणि विप्रोचे अजीम प्रेमजीदेखील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. प्रेमजी यांनी विप्रोमधील १८ टक्के भागीदारी दान केली आहे. याआधीदेखील त्यांनी २१ टक्के भागीदारी दान केली होती.
यादीनुसार कमीत कमी १० उद्योगपतींची मालमत्ता ६,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्तने कमी झाली आहे. याबाबतीत अंबानींनंतर जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी अार्सेलर मित्तलचे नुकसान झाले आहे. त्यांना २०,३६० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ते तीन क्रमांकांनी खाली आठव्या स्थानावर अाले आहेत. यात ४० पेक्षा जास्त उद्योगपतींची मालमत्ता वाढली असून यात सायरस पूनावाला यांची मालमत्ता ११,२२० कोटी रुपयांनी वाढली आहे.