आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानी पुन्हा बनले सर्वात श्रीमंत भारतीय, सन फार्माच्या दिलीप संघवींना दुसरे स्थान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क/ मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत भारतीय बनण्याचा मान मिळवला आहे. अंबानींनी १९.६ अब्ज डाॅलरच्या नेटवर्थनुसार पहिले स्थान पटकावले आहे. फार्मा क्षेत्रातील दिग्गज दिलीप संघवी सात आठवड्यांपर्यंत पहिल्या स्थानावर राहिल्यानंतर ते आता दुसऱ्या स्थानावर ढकलले गेले. शेअर बाजारातील घसरणीदरम्यान संघवी यांच्या नेतृत्वाखाली सन फार्मा या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य सोमवारी २.२२ टक्क्यांनी घसरले. मात्र अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये ०.५५ टक्के एवढीच घसरण दिसून आली. परिणामी संघवी यांच्या नेटवर्थमध्ये ४५ कोटी डाॅलर्सची घट दिसून आली.
बिझनेस मॅगझिन फोर्ब्जच्या रिअल टाइम अपडेटमध्ये श्रीमंत भारतीयांच्या यादीत संघवी १९.३ अर्ब्ज डाॅलरच्या नेटवर्थनुसार दुसऱ्या स्थानावर आहेत. श्रीमंतांच्या वैश्विक यादीत अंबानी ४६ व्या आणि संघवी ४८ व्या स्थानावर आहेत. टाॅप ५० श्रीमंतांच्या यादीत दाेन भारतीय आहेत. गेल्या २ मार्चला फोर्ब्जच्या वार्षिक यादीत अंबांनी ३९ व्या आणि संघवी ४४ व्या स्थानावर होते. मात्र दोन दिवसांनंतर ४ मार्चला संघवींनी सन फार्माचे मार्केट कॅप वाढीने अंबानींना मागे टाकले होते.
बातम्या आणखी आहेत...