आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आर्मको’चा जगातील सर्वात मोठा आयपीओ, 5 टक्के शेअरमधून 100 अब्ज डॉलर करणार जमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी ‘सौदी आर्मको’ आता सर्वात मोठा आयपीओ  आणण्याचा विचार करत आहे. आयपीओमध्ये फक्त ५ टक्के शेअरच्या माध्यमातून १०० अब्ज  डॉलर (६.७ लाख कोटी रु.) जमा करण्याची योजना आहे. २०१४ मध्ये आलेल्या  अलिबाबाच्या आयपीओपेक्षा हा आयपीओ चार पट जास्त मोठा आहे. अलीबाबाचा २५  अब्ज डॉलर (१.६७ लाख कोटी रु.)चा आयपीओ आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे. सौदी सरकार पुढील वर्षी आर्मकोचा आयपीओ आणणार आहे. 

ही कंपनी फक्त ५ टक्के शेअरच्या माध्यमातून १०० अब्ज डॉलर जमा करण्यात यशस्वी झाली, तर या कंपनीचे मूल्यांकन दोन लाख कोटी डॉलर (१३४ लाख कोटी रु.) होईल. याची लिस्टिंग सौदी शेअर बाजार ‘तडाउल’मध्ये होणार आहे. मात्र मूल्यांकन जास्त असल्यामुळे कमीत कमी एका विदेशी शेअर बाजारातही लिस्टिंग करण्यात येणार आहे.  यासाठी हाँगकाँग, सिंगापूर, न्यूयॉर्क, लंडन आणि टोकिओ शेअर बाजारामध्ये स्पर्धा आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर आणि पाउंडची स्थिती पाहता कंपनी न्यूयॉर्क किंवा लंडन येथील शेअर बाजाराची निवड करण्याची शक्यता आहे.  
 
आयपीओचा पैसा कंपनीच्या खात्याऐवजी सरकारच्या विशेष निधीमध्ये जमा होणार आहे. या माध्यमातून इतर क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सौदीमधील सर्व अर्थव्यवस्था तेलावर आधारित आहे. गेल्या दोन वर्षांत तेलाच्या खासगी किमतीमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. सौदी अरब जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. व्हेनेझुएलानंतर सर्वात मोठे तेलाचे भांडारदेखील याच देशात आहे. त्यामुळे हा देश कच्चा तेलाच्या किमती जास्त ठेवण्याचा प्रयत्न करेल. कच्च्या तेलाच्या किमती जास्त राहिल्यास त्याचा फायदा अर्मकोच्या शेअरलादेखील होईल. आर्मकोचे १३४ लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन सौदी सरकारचे आहे. मात्र, तज्ज्ञ या मताशी सहमत नाही. 

भारताच्या जीडीपीबरोबर 
मुंबई शेअर बाजारात लिस्टेड सर्व कंपन्यांचा मार्केट कॅप ११७.३३ लाख कोटी रुपये आहे. अार्मकोचे १३४ लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन भारतातील सर्व लिस्टेड कंपन्यांपेक्षा जास्त असणार आहे. भारताच्या जीडीपीच्या बरोबरीत याचे मूल्यांकन असेल. 
बातम्या आणखी आहेत...