आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विक्रांत’च्या लोखंडापासून बनवली बाइक, एक फेब्रुवारीला करणार सादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील पहिली विमान वाहतूक करणारी नौका "आयएनएस विक्रांत' आता अस्तित्वात नसली तरी तिचा नवा अवतार लवकरच समोर येणार आहे. वास्तविक एका ऑटोमोबाइल कंपनीने या नौकेच्या लोखंडापासून (मेटल) बाइक बनवली असून १५० सीसी क्षमतेची ही बाइक एक फेब्रुवारी राेजी सादर करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप या बाइकची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

विक्रांतच्या स्क्रॅपमधून निघालेल्या लोखंडाची खरेदी करून कंपनीने त्याला नवीन "ब्रँड'चे रुपडे दिले आहे. या "ब्रँड'ला नौकेच्या नावानुसारच "व्ही' हे नाव देण्यात आले असून याचा "लोगो' बाइकच्या पेट्रोल टाकीवर लावण्यात येणार आहे. यासंबंधी बुधवारी कंपनीच्या वतीने बाइकची अधिकृत घोषणा करण्यात आली. कंपनीच्या वतीने सध्या तरी या बाइकची पोझिशनिंग आणि किमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही. असे असले तरी अपेक्षेनुसार ही प्रीमियम बाइक असेल.

"आयएनएस विक्रांत'ने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ३६ वर्षांपर्यंत देशाच्या सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या या विक्रांतला २०१४ मध्ये तोडण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यातून निघालेले लोखंड आणि इतर सामानाची नंतर विक्री करण्यात
आली होती.

कंपनीची अधिकृत घोषणा
सुमारे चार दशकांपर्यंत "आयएनएस विक्रांत' देशाचा गौरव होती. भारताच्या सैनिकी क्षमतेची ती प्रतीक होती. त्यामुळे या नौकेला बाइकच्या स्वरूपात सादर करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचा आम्हाला अभिमान असून बाइकच्या स्वरूपात "विक्रांत' सर्वांच्या मनात कायम राहील.

विक्रांतच्या नावाची नवी नौका
देशातील पहिल्या स्वदेशी विमान वाहन नौकेचे नावदेखील "विक्रांत' ठेवण्यात आले आहे. ही नौका कोचीनच्या शिपयार्डमध्ये बनवण्यात येत आहे. त्यासाठी २० हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.