आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSNL Land line Users Will Get Free Night Calls Facility

BSNL लॅंडलाईनवर रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत बोला मोफत, लवकरच अधिकृत घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत संचार निगम लिमिटेडकडून (बीएसएनएल) 1 मेपासून देशभरात लॅंडलाईनवर अनलिमिटेड नाईट कॉल्सची सुविधा दिली जाण्याची जोरदार तयारी सुरु आहे. या प्लॅनमध्ये लॅंडलाईन ग्राहकांना रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळणार आहे. टेलिकॉम कंपन्यांकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांच्या पार्श्वभूमिवर लॅंडलाईन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही सुविधा जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
लॅंडलाईनवरुन कॉल करणारे झाले कमी, ब्रॉडबॅंड वाढले
मोबईल क्रांतीमुळे लॅंडलाईनला असलेली मागणी झपाट्याने कमी झाली आहे. आता बोलण्यासाठी लॅंडलाईन घेणारे ग्राहक अपवादानेच दिसून येतात. पण हायस्पिड ब्रॉडबॅंडसाठी लॅंडलाईनला प्राथमिकता देणारे ग्राहक वाढले आहेत. जानेवारी 2015 मध्ये देशभरात 2.50 कोटी लॅंडलाईनधारक होते. 31 मार्चपर्यंत ही संख्या 2.80 कोटींपर्यंत गेली आहे. सहा कोटी ग्राहकांना सेवा देता येईल एवढी बीएसएनएलची क्षमता आहे. पण नवीन मागणी पुढे येत नाहीये. एवढेच नव्हे तर लॅंडलाईनवरुन बोलणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
ग्रामिण भागात बीएसएनएलकडून 120 रुपयांच्या मासिक भाड्यावर 120 रुपयांचे कॉल मोफत दिले जातात. एक मेपासून यात वीस रुपयांनी वाढ केली जाणार आहे. आता मासिक भाडे 140 रुपये असेल आणि 140 रुपयांचे कॉल मोफत दिले जातील. शहरी भागात मासिक भाडे 210 रुपये असून त्यातून 195 रुपयांचे कॉल मोफत मिळतात.