आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किरकोळ महागाई दरात घाऊक घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय ग्राहकांना महागाईपासून थोडा दिलासा मिळाला असून सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर घसरणीसह ४.३१ टक्क्यांवर आला आहे. त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच आॅगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर ५.०५ टक्के नोंदवण्यात आला होता.
भाज्यांच्या किमतीत झालेली घसरण, इंधन, वीज आणि सेवा क्षेत्रात वाहतूक तसेच दूरसंचार क्षेत्रातील महागाई दर तुलनात्मक स्वरूपात कमी झाला आहे. त्यामुळे महागाई दर १३ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. असे असले तरी साखर आणि डाळींच्या किमतीमधील महागाई अद्याप कमी झालेली नाही. साखरेच्या किमतीत सुमारे २५.७७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर ४.३१ टक्के नोंदवण्यात आला आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात िकरकाेळ महागाई दर ५.०५ टक्के नोंदवण्यात आला होता, तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर ४.४१ टक्के होता. किरकोळ महागाईचा हा ऑगस्ट २०१५ नंतरचा नीचांक आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हा ३.७४ टक्के नोंदवण्यात आला होता.

डाळी महागच
किरकोळ महागाई दरात सरकार तसेच लोकांना दिलासा मिळाला असला तरी यामध्ये साखर आणि डाळींच्या किमतीतील महागाई दर कमी झालेला नाही. साखरेच्या किमतीमध्ये २५.७७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर दुसरीकडे डाळींच्या किमतीत १४.३३ टक्क्यांची वाढ दिसून आली.

भाज्या झाल्या स्वस्त
आकडेवारीनुसार गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या वर्षी सप्टेंबर महिन्यात भाज्या ७.२१ टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. दळणवळण आणि दूरसंचार सेवा क्षेत्रातील महागाई दर २.७० टक्के तसेच इंधन-वीज या उत्पादनातील महागाई दर ३.०७ टक्के नोंदवण्यात आला. यामुळेदेखील महागाई दरात घसरण दिसून आली. अन्नपदार्थ उत्पादनातील किरकोळ महागाई दर ३.८८ टक्के राहिला.
बातम्या आणखी आहेत...